शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंनिसद्वारे आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:59 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने २४ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात पार पडला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल

ऑनलाईन लोकमतवर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने तथा अनेकांत स्वाध्याय मंदिर यांच्या सहकार्याने २४ वा आंतरजातीय सत्यशोधकी विवाह सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात पार पडला. अनेक रूढी, परंपरा यांना फाटा देत नवीन मूल्य याद्वारे रूजविण्यात आले.पारस अनंत तांबेकर व दीपा विजय मसराम हे एका खासगी दवाखान्यात नोकरीला होते. दोघांची ओळख झाली. यातून जिव्हाळा निर्माण झाला. एकमेकांना समजून घेतले जात ४ ते ५ वर्षे गेली. अखेर सर्व विचारांती लग्नाचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे जात, धर्माच्या अडचणी निर्माण झाल्या. दोघांनीही आपापल्या कुटुंबाला विश्वासात घेत गैरसमज दूर केले. गजेंद्र सुरकार यांनी मुलीच्या कुटुंबासह मुला-मुलीचे विवाहपूर्व समुपदेशन केले. अखेर २६ फेब्रुवारी दिवस ठरला. या लग्नात कोणतेही कर्मकांड, रूढी न पाळता अक्षतांना फाटा देत फुलांचा वापर केला गेला.यावेळी अनेकांत स्वाध्याय मंदिरचे अध्यक्ष डॉ. महावीर पाटणी, सचिव सावळकर, विश्वस्त भागवतकर, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धीप्रिय कबीर औरंगाबाद, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, राष्ट्रसेवा दलाचे सचिव सोमनाथे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत केले तर वधू-वराचे स्वागत डॉ. महावीर पाटणी यांनी केले. यानंतर सारिका डेहनकर हिने वधू-वरांना सप्तपदी म्हणवून घेतल्या. यावेळी सर्वांनी पुष्प वर्षाव केला.सुनील सावध, भरत कोकावार यांनी वधू-वरांकडून शपथा म्हणवून घेतल्या. हारार्पणानंतर भीमसेन गोटे यांनी वधू-वरांकडून आभार वदवून घेतले. प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन व महात्मा फुलेंचा अखंड, आम्ही प्रकाशबिजे हे गीत सादर करीत प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले. आभार अनिल मुरडीव यांनी मानले. संचालन व विवाह सोहळा गजेंद्र सुरकार यांनी पार पाडला. कार्यक्रमाला अ‍ॅड. भास्कर नेवारे, संजय भगत, राजेंद्र ढोबळे, गोवर्धन टेभुर्णे, वैभव सुरकार, रेशमा सुरकार, निलेश घोडखांदे, एकनाथ डहाके, नितेश पाटील आदींनी सहकार्य केले. हा आगळा वेगळा विवाह पाहण्यास वर्धा शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.