शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींचे कार्य कृतीशील व स्वत:पासून असणे प्रेरणादायी

By admin | Updated: September 9, 2016 02:22 IST

गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत.

रफीउल्लाह : नई तालीम समिती परिसरातील शांती भवन अध्ययनसेवाग्राम : गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत. गांधीजी काय आहे हे त्यांच्या वास्तव्यातील भूमीत कळले. प्रार्थना सर्व धर्मात होते. पण या ठिकाणी मोकळ्या जागेत सर्व धर्माची प्रार्थना हा एक वेगळा अनुभव आला. गांधीजींनी सर्व धर्मांचा आदर सांगितला असला तरी ते प्रत्यक्ष जगले. त्यांचे कार्यच मुळात कृतीशील आणि स्वत:पासून होते. अहिंसेची शिकवण ही जगासाठी देण असल्याने संपूर्ण जगाला बापूंच्या विचाराशिवाय पर्याय नसल्याचे युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट आॅफ पीस एशिया सेंटरचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी रफीउल्लाह स्टनीक झाई म्हणाले. नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये तीन दिवसांसाठी गौहरशाह खाजगी विद्यापीठ काबूल अफगानीस्थान येथील २४ विद्यार्थी आपल्या दोन प्राध्यापकासह शांती, अंहिसा आणि कृतीशील गांधीविचार समजावून व अध्ययनासाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. रफीउल्लाह म्हणाले, विद्यापीठात गांधी व अहिंसा यावर शिकविले जाते. संगठनेद्वारे शांती शिक्षण तसेच विद्यार्थ्यांसाठी युवा शांती केंद्राद्वारे महिन्यातून कृतीशिल कार्यक्रम होतो आणि जुने विद्यार्थी नव्यांना यात सहभागी करून शांती आणि अहिंसेचे महत्त्व सांगतात. प्रशिक्षणसुद्धा दिल्या जाते. नंगरहार व हैरान या राज्य विद्यापीठाचे विद्यार्थी भारतात याच विषयाअंतर्गत येणार असल्याचेही ते म्हणाले. गांधीजी आणि अहिंसा हे खूप जवळचे वाटतात. त्याचे कारण म्हणजे सरहद गांधी (खान अब्दुल गफ्फार खान) आम्ही सर्व १ सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये आलो. गांधी दर्शन समितीमध्ये मुक्काम केला. दि. ५ रोजी सेवाग्राम आणि ७ रोजी परत दिल्लीसाठी रवाना होत आहे. गांधी ते नेल्सन मंडेला या थीमवर नविन बॅच अध्ययन करणार असल्याचे रफीउल्लाह यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)