अहवालावर तातडीने उपाययोजनेच्या सूचना आर्वी : येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना असुविधांमुळे मरणयातना सोसाव्या लागत असल्याचे गुरुवारी ‘लोकमत’च्या वृत्ताने उघड झाले. याची दखल घेत झोपेत असलेल्या बांधकाम विभागाला जाग आली. गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत भास्करवार यांनी दोन अभियंत्यांना या वसतिगृहामध्ये पाठवून येथील गैरसोयी व असुविधांची माहिती करीत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आर्वीतील शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याने या बाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले व येथे असलेल्या असुविधांचा पाढा वाचला. यावर येथील गैरसोयी तातडीने दूर होण्यासाठी दखल घेतली. यात तंत्रनिकेतनला त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या समस्यांचा निपटारा करावा लागणार आहे. महाविद्यालय सुरू झाल्यापासून येथे असुविधांची वाढ झाली आहे. येथील तंत्रनिकेतनचे मेस ही सर्व विद्यार्थी मिळून चालवितात. मेसचे खासगी कंत्राट दिल्याची माहिती मिळाली. वसतीगृहात रात्रीच्यावेळी विद्यार्थी आजारी पडल्यास सुरक्षा रक्षकच विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेतो.
वसतिगृहातील असुविधांची बांधकाम विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 01:38 IST