शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

१५०० रुग्णांची तपासणी व औषधींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:44 IST

ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेत बरीच तफावत आहे.

ठळक मुद्देआरोग्य शिबिर खासदार निधीतून १० खाटा व रुग्णवाहिका मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेत बरीच तफावत आहे. ही तफावत दूर करून ग्रामीण रुग्णांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून पं. दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त आरोग्य शिबिरे घेण्यात येत आहे. शनिवारी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यात १५०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषधीचे वितरण केले गेले. स्थानिक विकास निधीतून १० खाटा व रुग्णवाहिका देण्याची घोषणा यावेळी खा. रामदास तडस यांनी केली.भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेत आयोजित शिबिराचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, जिल्हा सरचिटणीस अविनाश देव माजी खासदार सुरेश वाघमारे, जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल नारलवार, नगराध्यक्ष शीतल गाते, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. सदस्य किशोर गव्हाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजीव बतरा, न.प. आरोग्य सभापती ममता बडगे, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे आदी उपस्थित होते.यावेळी खा. तडस म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा अभाव जाणवतो. या शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्याचा भाजपा शासनाचा प्रयत्न आहे. या शहराचा विकास व्हावा, नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून या ग्रामीण रुग्णालयात खासदार निधीतून १० खाटा व १० लाख रुपये खर्चाची रूग्णवाहिका देऊन चांगली रुग्णसेवा देऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी चले जाव आंदोलन सुरू केले व इंग्रजांना देश सोडण्यास बाध्य केले. या आंदोलनाचा व त्यातील शहिदांचा काँग्रेस शासनाला विसर पडला होता. चले जाव आंदोलनाला आज ७५ वर्षे झाली. त्या आंदोलनाचे स्मरण म्हणून भाजप शासनाने स्वच्छ व स्वस्थ भारत अभियान सुरू केले, असे डॉ. रामदास आंबटकर यांनी सांगितले. याप्रसंगी माजी खासदार वाघमारे, अविनाश देव, जयश्री गफाट, संजय गाते यांनीही मनोगत व्यक्त केले.शिबिराला नितीन बडगे, न.प. उपाध्यक्ष आशिष गांधी, राजीव जयस्वाल, शहराध्यक्ष मंगेश झाडे, नगरसेवक, सभापती, ग्रामीण रुग्णालय, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), भाजयुमो आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश झाडे, संचालन आकाश दुबे, राजू पनपालिया यांनी केले तर आभार जितेंद्र वर्मा यांनी मानले.