शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

तळेगावात दारूबंदी मंडळात दारूविक्रेत्यांचाही शिरकाव

By admin | Updated: January 10, 2015 01:52 IST

जिल्ह्यात दारूबंदी असताना तळेगाव(टा.) येथे मुबलक दारू मिळत असे. त्यामुळे येथील महिलांनी कंबर कसली.

तळेगाव (टा.) : जिल्ह्यात दारूबंदी असताना तळेगाव(टा.) येथे मुबलक दारू मिळत असे. त्यामुळे येथील महिलांनी कंबर कसली. तरीही दारू थांबत नसल्याने येथील ठाणेदारांनी दारूविक्रेत्यांनाच दारूबंदीचे आवाहन केले. त्यामुळे दारूविक्रेत्यांनी पुरुष दारुबंदी मंडळाची स्थापना केली. परंतु दोन गट गावात सक्रीय झाल्याने खरोखरच दारूबंदी होईल का, असा प्रश्न पडला आहे. तळेगावात चार महिन्यांपूर्वी दारूचे पाट वाहत होते. गावात अराजकता पसरली होती. माजी सरपंचालाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. त्यामुळे माजी सरपंचानाने दारूबंदीकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांना दारूबंदीसाठी निवेदन दिले. नव्याने सत्तारूढ झालेल्या ग्रामपंचायतने सुरवातीला दारूबंदी सहमत असहमत सर्वेक्षण करून चाचणी घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी नोंदणी केली. यानंतर ग्रा.पं. मध्ये दारूविक्रेत्यांची बैठक बोलावून सरपंच अतुल तिमांडे यांनी गावात १४ आॅगस्ट पासून गावात दारूबंदी होईल. त्यामुळे तुम्ही दारूबंदी करा, अशा सूचना केल्या. यावर दारूविके्रत्यांनी दुजोरा देत राहिलेला मात विकण्याची एक महिन्याची परवानगी मागितली. नंतर १४ आॅगस्टपासून दारूबंदीबाबत विशेष सभा घेण्यात आली. यावेळी गावातील तंटे सोडविण्याकरिता व दारूबंदी करण्याकरिता महिलांशी चर्चा करून तेजस्विनी मंडळाची स्थापना केली. अल्लीपूर पोलीस ठाण्याला नव्याने रुजू झालेले ठाणेदार मगर यांनी वेळोवेळी ग्रामपंचायतमध्ये दारूबंदी बाबत सभा बोलावल्या. शिवाय वेळोवेळी पोलिसाचा ताफा गावात येत असे. आॅगस्ट महिन्यापासून गावातील महिला मंडळ दररोज संध्याकाळी दोन तास फिरून आढावा घेत असे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला होता. कालांतराने मोबाईलवर लोकेशन मिळवून छुप्या मार्गाने काही मद्यप्रीय दारू मिळवू लागले. याचा त्रास दारू विक्री करणे सोडलेल्यांनाही होत होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी अल्लीपूरचे ठाणेदार भानुदास पिदोरकर यांनी दारूविक्रेत्यांची चर्चा केली. चर्चेअंती दारूविके्रत्यांनीच गावात पूर्णपणे दारूबंदीचा निर्णय घेतला. अल्लीपूर पोलीस स्टेशनला जाऊन पुरूष दारूबंदी मंडळाची स्थापनाही केली. एवढेच नाही तर ठाणेदाराच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या निनादात रॅलीही काढली. गावात एक तेजस्विनी महिला मंडळ व दुसरे पुरूष मंडळ असे दोन गट दारूबंदीसाठी सक्रीय झाले आहे. त्यामुळे खरोखरीच दारूबंदी होईल की यातून नवा वाद उत्पन्न होईल, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)