शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पुलगावच्या तहसील कार्यालयाची चौकशी

By admin | Updated: July 12, 2017 02:11 IST

पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालय शोभेचे ठरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच

 वृत्ताची दखल : सेतू केंद्रासह नागरिकांचे नोंदविले बयाण, नायब तहसीलदार गैरहजर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालय शोभेचे ठरत आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत मंगळवारी पथक पाठवून तपासणी केली. यावेळी सेलू केंद्रातील संगणक चालक तथा दोन नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले. चौकशी पथक दाखल झाले असतानाही नायब तहसीलदार राठोड गैरहजरच होते, हे विशेष! पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयात कुठलीही कामे होत नसल्याने ते बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय व महाआॅनलाईनच्या अधिकाऱ्यांनी दखल घेत पाहणी केली. मंगळवारी देवळी, पुलगाव व वर्धा येथील सेतू केंद्रांची तथा पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी ३३ रुपये शासकीय किंमत असताना कुठे ५०, कुठे १५० तर कुठे त्यापेक्षाही जास्त रक्कम आकारली जात असल्याचे आढळून आले. याबाबत पुलगाव येथील नायब तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्राचे संगणक चालक कपील शेंडे यांचे बयाण नोंदविण्यात आले. यात केंद्र संचालकाने सांगितल्याप्रमाणे आकारणी केली जात असल्याचे त्याने सांगितले. सदर केंद्र स्मिता भुसारी व नितेश रावेकर यांच्या नावावर आहे. शिवाय दोन नागरिकांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यांनी ३३ रुपयांऐवजी ५० व १५० रुपयांची मागणी केली जात असल्याचे नमूद केले. हे बयाण पथकाने देवळीचे नायब तहसीलदार वरपे यांच्याकडे सोपविले आहे. पथकाद्वारे चौकशी सुरू असताना पुलगाव येथील नायब तहसीलदार राठोड हे गैरहजर होते. यामुळे पुलगाव नायब तहसीलदार कार्यालयातील गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. तपासणी पथकामध्ये परिविक्षाधिन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक कदम, अतूल रासपायले, संजय मानेकर, वरपे व महाआॅनलाईनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. देवळी, पुलगाव तहसील कार्यालयातील ग्रामदूत सेवा व विविधा केंद्रात गैरप्रकार आढळल्याने कार्यवाही होणार असल्याचे पथकाद्वारे सांगण्यात आले. ‘त्या’ खांबांवर काँक्रीटचा मुलामा रस्त्याच्या रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. यातील बॅचलर रोडवर आर्वी नाका चौकात असलेले विद्युत खांब महावितरण कापून काढले. यात रस्त्यावर अनकुचिदार लोखंड राहिले होते. यामुळे वाहने पंक्चर होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत महावितरणने त्या अणकुचिदार लोखंडाला सिमेंट काँक्रीटचा मुलामा दिला आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला.