शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

पायका योजनेंतर्गत बांधलेल्या क्रीडांगणाची चौकशी करा

By admin | Updated: May 17, 2014 23:50 IST

शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्‍यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़

विरूळ (आकाजी) : शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्‍यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़ असाच प्रकार सध्या क्रीडा क्षेत्रातही पाहावयास मिळत आहे़ शासनाद्वारे क्रीडांगणासाठी निधी दिला जातोय; परंतु केवळ फलकांपुरते क्रीडांगण दाखवून निधीचा अपहार केला जातो़ यात हजारो रुपयांचा गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे़ ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे़ त्यांना खेळण्यासाठी गावात मैदान असावे, या प्रामाणिक हेतूने पायकांतर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीला निधी देण्यात आला़ पंचायत समितीमार्फत तालुक्यातील काही निवडक गावात क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ त्याचप्रमाणे आणि तालुक्यातही पंचायत समितीस्तरावर १४ गावांना या क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ यात विरूळ, रसुलाबाद, रोहणा, धनोडी, दहेगाव (मुस्तफा), देऊरवाडा, वर्धमनेरी, मांडला, वडगाव, वाढोणा, मोरांगणा, जळगाव, वाठोडा व शिरपूर आदी गावांचा समावेश आहे़ क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध झाल्याने वाठोडा व शिरपूर वगळता १२ गावामध्ये क्रीडांगण तयार झालीत, परंतु काही महिन्यातच या क्रीडांगणाची वाताहत झाली आहे़ लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या क्रीडांगणावर आज विद्यार्थी खेळत नसले तरी गुरे-ढोरे मात्र हमखास चरतांना दिसतात़ क्रीडांगणावर काटेरी झुडपे, गवत उगविल्याने नेमके क्रीडांगण कोठे आहे़ याचा शोध घ्यावा लागतो़ या क्रीडांगणावर केवळ नावापुरता फलक लागला आहे़ काही गावात गावाच्या बाहेर दूर क्रीडांगणे बांधल्या गेली़ त्यामुळे विद्यार्थी क्रीडांगणावर खेळण्यास जातच नसल्याचे दिसते़ क्रीडांगण तयार करण्यासाठी एक लाख रुपये ग्रामपंचायतींना देण्यात आले़ मैदान तयार झाले़ पण खेळाडूंच्या साहित्यासाठी अद्यापही निधी न मिळाल्याने हे क्रीडांगणे शोभेची वस्तू ठरली आहे़ क्रीडांगणाच्या बांधकामाची जबाबदारी पंचायत समितीचा शाखा अभियंता व ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आली. ही संधी मिळताच काही ग्रामसेवकांनी मर्जितल्या ठेकेदाराला काम देत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या कामात गौडबंगाल झाल्याचा संशय येतो़ यामुळे संबंधीत अधिकार्‍यांनी क्रीडागणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)