शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोहता मिलमध्ये कामगारांवर अन्याय

By admin | Updated: March 30, 2015 01:39 IST

आरएसआर मोहता जिनिंग अ‍ॅण्ड विव्हींग मिल व्यवस्थापन दोन वर्षांपासून कामगारांवर अन्याय करीत आहे.

हिंगणघाट : आरएसआर मोहता जिनिंग अ‍ॅण्ड विव्हींग मिल व्यवस्थापन दोन वर्षांपासून कामगारांवर अन्याय करीत आहे. याबाबत अनेकदा कामगार मंत्री व आयुक्त नागपूर यांच्याशी व्यवस्थापनाच्या बैठकी घेतल्या; पण काहीही उपयोग झाला नाही़ अन्यायामुळे कामगार त्रस्त झाले असून व्यवस्थापनाला समज देण्याची मागणी निवेदनातून केली आहे़कपडा विभागातील ४१० कामगार कमी करण्यासाठी व्यवस्थापनाने औद्योगिक न्यायालय नागपूर येथे खटला दाखल केला़ न्यायालयात प्रकरण सुरू असताना व्यवस्थापन कामगारांना त्रास देत आहे. यामुळे कामगार त्रस्त झाले आहेत़ अलीकडे संबंधित को.वा. खात्यात बदली कामगारांना सुमारे ५ महिन्यांपासून बदली काम देण्यात येत नाही. त्यांना महिन्यात दोन ते तीन दिवस काम दिले जात आहे़ यामुळे या खात्यातील कामगारांसह राजू तिमांडे व आफताब खान यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले़ यात व्यवस्थापनाच्या अरेरावी धोरणाबाबत त्वरित बैठक बोलवून कामगारांवर होत असलेला अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली़ मिल व्यवस्थापन कामगारांवर अन्याय करीत असल्याने असंतोष वाढला आहे. यासाठी कामगारांवरील अन्याय कमी करणे गरजेचे आहे. याबाबत अप्पर कामगार आयुक्त नागपूर यांनाही कामगारांनी निवेदन सादर केले़ व्यवस्थापनाकडून कामगारांवर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे़ याप्रसंगी संघाचे सचिव आॅफताब खान, माजी आमदार राजू तिमांडे संघाचे उपाध्यक्ष विजय महाबुधे, शरद दांडेकर, अनवर खा नवाब खा, पद्माकर कोहपरे व बहुसंख्य कामगार उपस्थित होते. मोहता मिलच्या व्यवस्थापनाचा कामगारांवरील अन्याय असाच सुरू राहिला तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आफताब खान, राजू तिमांडे व कामगारांच्यावतीने निवेदनातून देण्यात आला आहे़(तालुका प्रतिनिधी)