शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष! ... ‘भावाने’ केला बहिणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:43 IST

बहिणभावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कारंजा येथे उघडकीस आली. येथे राहणाऱ्या एका सावत्र भावाने आपल्या बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

ठळक मुद्देपीडिता गर्भवतीसावत्र भावाकडून अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहिणभावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कारंजा येथे उघडकीस आली. येथे राहणाऱ्या एका सावत्र भावाने आपल्या बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही पिडिता गर्भवती झाल्याने हे प्रकरण उजेडात आले. कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कारंजा नजीकच्या एका गावात अल्पवयीन मुलीवर सावत्र भावाने अनेकदा अत्याचार केला. सुमारे वर्षभरापूर्वीपासून सावत्र भाऊ पीडितेवर अत्याचार करीत आहे. पीडितेला मासिक पाळी न आल्याने तिची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. प्रकृती स्थिर न झाल्याने शनिवारी पीडितेच्या आईने तिला कन्नमवारग्राम येथील शासकीय रूग्णालयात नेले. तेथे तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे पुढे आले.

त्यानंतर पीडितेने सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. सावत्र भावानेच वारंवार अत्याचार केल्याचे समजताच पीडितेसह तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेतली आहे. पुढील तपास कारंजा (घा.) पोलीस करीत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडितेची आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार