शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर महागाईचे सावट

By admin | Updated: August 29, 2016 00:33 IST

शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे.

शेतकरी चिंतेत : बैलांची संख्या घटतीवर आर्वी : शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे. या स्थितीमुळे बाजारात असलेल्या साहित्य खरेदीकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. साहित्याला महागाईची झळ बसल्याने शेतकऱ्यांना ते असह्य होत आहे. यामुळे त्याने बाजाराकडे पाठ केल्याचे दिसत आहे. सणाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. या पावसामुळे पिकांचा पाचोळा होण्याची वेळ आली आहे. जर एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहेत. याच दिवसात पोळा सण आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. वर्षभर शेतात इमानेइतबारे कबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा पोळा हा सण बळीराज नेहमीच आगळावेगळा आणि उत्साहाने साजरा करतो. त्याचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न त्याच्याकडून होतो. सध्या निसर्गाकडून होत असलेली अवकृपा, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्री करणे सुरू केले आहे. परिणामी बैलांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बैलांचा साज आसमानाला रंगबेरंगी कासरे, १०० रुपये पर्यंत तर देखणी गोडे ५० रुपये, बाशींग जोडी १०० रुपये, वेसन ७५ रुपये, गोडे झुल्याचे १५० रुपये, तोडे घुंगरे ५०० रुपये जोडी, कापडी माळ २५० रुपये, मठाटी १०० रुपये, जोडी तर बासींग फुल १०० रुपये जोडी, जिलेटींग पेपर गेरू, आॅईल पेन्ट आदी शेतकऱ्यांच्या उपयोगी असलेल्या वस्तूंचे भाव दामदुप्पट झाल्याने शेतकऱ्यांचा पोळा सण महागाईच्या विळख्यात सापडला आहे. आपला बैल जोडीच्या भरोश्यावर बाराही महिने राबराब राबून त्याच्या भरोश्यावर शेती पिकवून साऱ्यांच्या पोटाला अन्न देणाऱ्या बळीराजाचे त्याच्या बैलावर जीवापाड प्रेम असते. यामुळे त्याच्या साजात बळीराजाकडून कसर होत नाही. अशा स्थितीतही पोळा सण साजरा करण्याकरिता शेतकरी मागे येत नाही.