शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीवर विषाणूजन्य आजाराची लागण

By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST

निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील

गिरड : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात मिरचीची लागवड केली. मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्यानंतर रबीतील भाजीपाला उत्पादनावर वातावरणाच्या बदलाने किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी मिरची पिकांवर विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या वातावरणामुळे खरिपातील शेतपिकांनी शेतकऱ्यांना दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या सततच्या हवामान बदलामुळे खरिपातील शेतपिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने शेतकरी कायमच वैतागला आहे. शेतपिकावर केलेला उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले असताना रबी हंगामात ढगाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मिरची पिकाला विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हैराण आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना नाइलाजास्तव भाजीपाला पीक लागवडीतून मिरची पिकाला हद्दपार करावे लागत आहे. एका बाजूला वाळल्या मिरचीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. शिवाय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधांच्या फवारणीवर बराच खर्च केला आहे. मिरची पिकाला वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी केलेला खर्च निष्फळ ठरला आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात मिरचीची लागवड करतात. लगतच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र यावर्षी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मिरचीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. या भागातील मिरची उत्पादनावर विदर्भातील बाजारपेठ अवलंबून आहे. मात्र उत्पादन घटल्याने भावात तेजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मिरचीच्या उत्पादनावर केलेला खर्च यंदा व्यर्थ ठरला आहे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.(वार्ताहर)