शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

संत्र्यावर अज्ञात रोगाचे सावट

By admin | Updated: February 9, 2016 01:53 IST

परिश्रम घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागांवर सध्या अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसते. संत्रा झाडे वाळत चालली आहे.

झाडे वाळत असल्याने शेतकरी चिंतेत : शेतकऱ्यांना मदतीची मागणीआष्टी (शहीद) : परिश्रम घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागांवर सध्या अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसते. संत्रा झाडे वाळत चालली आहे. सर्व उपाययोजना करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.मागील वर्षी अंबीया बहार मोठ्या प्रमाणात आल्याने कवडीमोल भावाने संत्रा विकावा लागला. यावर्षी मृग बहार दमदार असून भावही चांगले मिळण्याची शक्यता आहे; पण लहरी निसर्ग केव्हा कोपणार याचा भरवसा राहीला नाही. अचानक संत्रा बागा वाळत असल्याने हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. संत्रा झाडांची देखभाल करताना शेतकरी कुठलीही कसर ठेवत नाही. दरवर्षी छाट देऊन त्याला खत देणे, चुना व गुळाचे मिश्रण करून मारणे, खत घालणे, नियमित पाणी देणे एवढे करूनही संत्रा झाड वाळत आहेत. पाण्याची कमतरता असलेल्या गाव शिवारातील शेतकऱ्यांनी दूरवरून डोक्यावर पाणी आणून बागा जिवंत ठेवल्या आहेत; पण संत्राबागा एकाएकी वाळत असल्याचे दिसते. १०० झाडांमागे २५ झाडे वाळत आहेत. यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सूचवून मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. विहिरीच्या पाण्याची पाणी पातळी खालावत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विहिरीच्या पाण्यावर संत्राबागेचे सिंचन अवलंबून आहे. मृग बहाराची संत्री संगोपण करण्यासह वाळलेल्या झाडांना नष्ट करण्याचे कामही तालुक्यात सुरू आहे. माणिकवाडा, साहुर, तारासावंगा परिसरातील संत्रा बागा दव गेल्याने वाळत असल्याची माहिती साहूरच्या शेतकऱ्यांनी दिली. शासनाने सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे. महसूल व कृषी विभागाने अद्यापही सर्वेक्षण मोहीम घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मदतीकरिता प्रतीक्षाच करावी लागत आहे.(प्रतिनिधी)उपाययोजनाही ठरताहेत निकामीबदलत्या वातावरणामुळे फळपिकांवर विविध रोगांचे आक्रमण होत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा यांच्याकडून उपाययोजना सुचविण्यात आल्या; पण या ते उपाय करूनही परिसरातील अनेक बागायतदार शेतकऱ्यांच्या बागांतील संत्रा झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देणेच गरजेचे झाले आहे. नियोजित बागांवरही फायटोप्थोरा रोगसंत्रा बागांचे नियोजन व आखणी तालुका कृषी विभागाकडून करण्यात आली होती; पण त्या बागांवरही फायटोप्थोरा रोग आला आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे बागा वाळत आहेत. यावर तालुका कृषी विभागाने संशोधन करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे; पण अद्यापही कृषी विभागाने लक्ष दिलेले नाही. संत्रा फळबागा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी विभागाची आहे; पण हा विभाग अयोग्य नियोजन व दुर्लक्षित धोरण बागळून असल्याने त्याचा कुठलाही उपयोग झाला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. किमान आता संत्राबागा वाळत असताना तरी शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्या व सर्वेक्षण करून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.