शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात आढळले अर्भक

By admin | Updated: December 30, 2014 23:40 IST

येथील यशवंत महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता असलेल्या स्वच्छतागृहात अर्भक आढळल्याने चांगलीच खळबळ माजली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली.

वर्धा : येथील यशवंत महाविद्यालयात विद्यार्थिनींकरिता असलेल्या स्वच्छतागृहात अर्भक आढळल्याने चांगलीच खळबळ माजली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली. मृतावस्थेत असलेले हे अर्भक सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास स्वच्छतागृहात गेली असता तिला अर्भक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. हे अर्भक दिसताच सदर तरुणी आरडा ओरड करीत बाहेर आली. तिने लगेच याची माहिती महाविद्यालयात उपस्थित असलेल्या प्राध्यापकाला दिली. सदर प्राध्यापकाने एका महिला प्राध्यापकाला याची माहिती दिली. महिला प्राध्यापिकेने स्वच्छतागृहात जावून पाहणी केली असता तिला अर्भक पडून असल्याचे दिसून आले. याची माहिती महाविद्यालयाच्यावतीने शहर पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दोंदे यांच्या मार्गदर्शनात पथक महाविद्यालयात दाखल झाले. या पथकाने पंचनाम करून सदर अर्भक सेवाग्राम रुग्णालयात पाठविले. सदर अर्भक मृतावस्थेत असून त्याचे वय पाच ते सहा महिने असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या घटनेने महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली असून महाविद्यालय व्यवस्थापनही चिंतेत आहे. (प्रतिनिधी)