नाचणगाव : इंडियन मिलिटरी स्कूलची ‘मॉडर्न टेक्नॉलॉजी इन इंडियन रेल्वे’ या विषयाची विज्ञान प्रतिकृतीचे देशभर कौतुक होत आहे. प्रथम तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर निवड झालेली ही प्रतिकृती राष्ट्रीय स्तरावर केरळ येथील ऐर्नाकुलममध्ये प्रदर्शित झाली. आता या प्रतिकृतीची दिल्ली येथील सीएसआयआरसाठी निवड झाली आहे. २६ व २७ एप्रिल रोजी ती दिल्ली येथे प्रदर्शित होणार आहे.इंडियन मिमिटरी स्कूलचे इयत्ता नववीचे विद्यार्थी शंतनू आसोले व रितीक गोटे यांना रेल्वे गेटचा आलेला अनुभव त्यांनी प्रतिकृतीत उतरविला. गेट बंद असताना सामान्यांना होणारा त्रास, दिरंगाई व येणाऱ्या अडचणी कशा दूर होऊ शकतील, या विचारातून विद्यार्थ्यांनी ही प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीचा भविष्यात इंडियन रेल्वेला होणारा उपयोग पाहता सीएसआयआर दिल्ली येथे निवड करण्यात आली. २६ व २७ एप्रिल रोजी ही प्रतिकृती दिल्ली येथे प्रदर्शित होणार असून सादरीकरणसाठी शाळेला ई-मेल प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, देशभरातून सीएसआयआरमध्ये केवळ ५० प्रतिकृतींची निवड केली जाते. प्रतिकृतीमध्ये तांत्रिक अडचणींबाबत निलेश जगताप व आशिष साळवे या विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संजय कोहळे, मनोज लोहे, उमेश खंडार, अर्चना राऊत, सुधीर वाघ, हेमंत जगताप यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. संस्थाध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, मुख्याध्यापक रविकिरण भोजणे, पर्यवेक्षक नितीन कोठे, अतुल वाकडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.(वार्ताहर)
इंडियन मिलिटरी स्कूलची विज्ञान प्रतिकृती सीएसआयआर दिल्लीमध्ये
By admin | Updated: April 12, 2016 04:30 IST