शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य निर्मितीनंतरच भारताची निर्मिती होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:42 IST

चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे शिरीष देशपांडे : भारत विद्यालयातील व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.भारत विद्यालयात स्व. भास्करराव भीमनवार यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ देशपांडे पूढे म्हणाले की, या देशात खुलेआम भारत तेरे तुकडे होंगे, असे म्हणणारी एक विचारधारा आहे. दुसरीकडे या देशातील मातीवर अफाट प्रेम करणारी विचारधारा आहे. यापैकी कोणती विचारधारा आपण निवडायची, हे आधी ठरवा. या मातीवर प्रेम करता आले पाहिजे; पण त्यासाठी केवळ चांगले असून भागत नाही तर त्या चांगुलपणाचे रक्षण करता आले पाहिजे. त्यासाठी जाती-पातीचे राजकारण नाकारले पाहिजे. आम्ही जात पाळत असू तर आम्ही जनावरांपेक्षाही चुकीचे वागत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाजी राजांनी मदारीसारखा राष्ट्रवादी मुस्लिम जवळ केला तर त्याच वेळी या देशाविरूद्ध लढणारा जयसिंग दूर लोटला, हा इतिहास आपल्यापूढे आहे. म्हणूनच मातीवर प्रेम करीत असतानाच भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाºयांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप भीमनवार होते. प्रास्ताविक वसंत आंबटकर यांनी केले. परिचय रमेश धारकर यांनी करून दिला. समरसता मंचाचे जिल्हा कार्यवाह बी.जी. खैरकार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन दत्ता भांगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका कल्पना मोरे यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प.अध्यक्ष प्रेम बसंतानी, पं.स. सभापती गंगाधर कोल्हे, रेखा भीमनवार, वर्धा नागरी बँकेचे संचालक रमेश टपाले, संस्थेचे उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संचालक विजय अग्रवाल, संजय देशपांडे, हरिहर लोंढेकर, वामनराव खोडे, संजय मेमोरीयलच्या सचिव वैशाली वणीकर, अ‍ॅड. साहित्यलक्ष्मी देशपांडे, शहरातील मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.