शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील सोलर प्रकल्पामुळे भारत आणि चीनचे संबंध होणार दृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 14:18 IST

भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला.

ठळक मुद्दे सोलर सिंचन प्रकल्पाचे हस्तांतर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी बारमाही शेती करावी, असे प्रतिपादन सोलर सिंचन प्रकल्पाच्या हस्तांतर आणि प्रकल्पाची पाहणी करताना चीनचे भारतातील मुंबई दुतावास कार्यालयातील अधिकारी (कॉन्सलर जनरल) चांग झीयुन यांनी पिंपळगाव (भोसले) येथे केले.चीनच्या सौर उर्जा प्रौद्योगिकी नावावर आणि सहयोगाने गरीबी उन्मूलनच्या पायलट कार्यक्रमांतर्गत मुंबई आधारित चीन वाणिज्यिक दूतावास युन्नान अक्षय उर्जा कंपनी मर्यादितच्या पिंपळगाव (भोसले) व नटाळा येथे प्रायोगिक तत्वावर चीन सरकार व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू केला. या प्रकल्पाचण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी चीन सरकारचे मुंबई येथील दूतावासातील अधिकारी (वाणिज्यिक कॉन्सलर) वाँग शिलकाई, प्रकल्पाचे मार्गदर्शक कोकण विभागाचे माजी आयुक्त नानाजी सत्रे, वांग ली, अश्विनी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, आर्वीच्या सभापती शिला पवार, सरपंच जीवन राऊत उपस्थित होते. या प्रकल्पामध्ये शेतकºयांना समप्रमाणात पाणी उलपब्ध व्हावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वितरणाच्या पाच नलिकेचे चेंबर बनविविले यामध्ये १० उपनलिका तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.या सोलर सिंचन प्रकल्पासाठी चीन सरकारच्यावतीने १.६० कोटी तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३० लाखांचा खर्च झाला आहे. या धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३० एच.पी. मोटरपंप बसविला आहे.यावेळी कार्यक्रमाला प्रकल्पाचे समन्वयक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी माजी अधिकारी शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, जलसंपदा विभागाचे उपअभियंता साबळे, जिल्हा परिषदच्या लघु सिंचन विभागाचे उपअभियंता लांडगे, ससाने, पोलीस पाटील सतीश इंगोले व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी चीन प्रतिनिधींनी प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्पचीनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प राज्यातील पहिला सोलर सिंचन प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पिंपळगाव व नटाळा येथील जवळपास ५० शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाचा लाभ होणार आहे. यामुळे या परिसरातील २२ हेक्टर शेती सोलर सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या ३० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

टॅग्स :chinaचीन