शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

बदलत्या ॠतूमानाने रुग्णसंख्येत वाढ

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

पावसामुळे बदलते ॠतुमान, ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.

आजारांचे थैमान : जुलै महिन्याअखेर २९ हजारांवर रुग्णांची नोंद वर्धा : पावसामुळे बदलते ॠतुमान, ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. यात संसर्गजन्य व श्वसनाचे आजार सर्वाधिक आहे. जुलै महिन्यात २६ हजार ९८५ बाह्यरुग्णांची तर १ हजार ८३९ आंतररुग्णांची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे १ ते १० आॅगस्ट दरम्यान १० हजार ६६१ बाह्यरुग्ण तर ३०० च्या वर आंतररुग्ण असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक आजार हे पाणी आणि दूषित हवेमुळे होतात. यामुळेच पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात सर्वत्र आजारांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दूषित पाण्यापासून होत असलेल्या डायरिया, गॅस्ट्रो आणि हवेमुळे पसरत असलेल्या सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाद्वारे या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. असे असले तरी रुग्णसंख्येत घट होत नसल्याचे वास्तव आहे. नागरिक स्वच्छतेबाबत अजूनही तितक्या प्रमाणात जागरुक नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात येते. जुलै महिन्यात जिल्ह्यात एकूण २८ हजार ८२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात २६ हजार ९८५ बाह्यरुग्ण तर १ हजार ८३९ आंतररुग्ण होते. आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत आंतर व बाह्यरुग्ण मिळून जवळपास ११ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांची वाढती गर्दी पाहता हा आकडा या महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)