शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन जीवनात खादीचा वापर वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:34 IST

खादी ही फॅशनच्या इतिहासात तशी जुनीच. आताच्या फॅशन जगात खादीही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेऊन येते. खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो.

ठळक मुद्देरामदास तडस : महाखादी व ग्रामोद्योग यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खादी ही फॅशनच्या इतिहासात तशी जुनीच. आताच्या फॅशन जगात खादीही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेऊन येते. खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. त्यामुळे खादीला प्रोत्साहन देण्याकरिता खादीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये जास्तीतजास्त करावा असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.महाखादी विक्री व प्रदर्शन तथा ग्रामोद्योग कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या ३७ व्या कार्यक्रमामध्ये 'खादी फॉर ट्रांसफोर्मेशन' हा नारा देऊन खादीचा वापर करण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले होते. त्यांच्या आवाहनाला देशातील लोकांनी प्रतिसाद देत धनत्रयोदशीला १.२ कोटीची विक्री झाली होती. त्यामुळे खादीला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खादीला आजच्या गरजेनुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आकर्षक केले जात आहे. त्यामुळे खादीला नवीन ओळख मिळाली, असे ते पुढे म्हणाले.वर्धा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. गांधीजींनी खादीला वेगळी ओळख मिळवून दिली. गांधीजी खादीचा वापर नियमित करीत. खादीला देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मागणी आहे. खादीचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने महाखादी यात्रा काढण्यात आली. मुंबई येथून राज्यपाल यांच्या हस्ते यात्रेस हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. ही महायात्रा वर्धा येथे पोहचली खा. रामदास तडस, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.महाखादी विक्री व प्रदर्शन तथा ग्रामोद्योग, महाप्रात्यक्षिक सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा उपनिबंधक अजय कडू, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणकर, उपजिल्हाधिकारी चौधरी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, दानदेव व मंडळातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खा. तडस यांनी सूतकताई केली. खादीचा प्रचार करून ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी सदर यात्रा काढण्यात आली आहे.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस