शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पूरक पोषण आहार पुरवठ्याच्या दरात वाढ करा

By admin | Updated: July 14, 2017 01:30 IST

सध्याच्या महागाईच्या काळात पूरक पोषण आहार पुरवठ्याचा दर अत्यल्प आहे. परिणामी, महिला बचत गटांना परवडेनासे झाले आहे.

बचत गटांची मागणी : माजी आमदारांना साकडेलोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : सध्याच्या महागाईच्या काळात पूरक पोषण आहार पुरवठ्याचा दर अत्यल्प आहे. परिणामी, महिला बचत गटांना परवडेनासे झाले आहे. यामुळे पोषण आहार पुरवठ्याचे दर वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सहा बचत गटातील महिलांनी माजी आमदार दादाराव केचे यांना निवेदन देत साकडे घातले.जिल्हातील महिला बचत गटाद्वारे २००६ पासून एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांत ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, गरोदर माता आदींना पूरक पोषण आहार पुरविण्याचे काम सुरू आहे. सर्व लाभार्थ्यांना कमी दरात पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. यामुळे याचे ई-टेंडरिंग न करता हे काम महिला बचत गटांकडे ठेवावे. ३० जून २०१७ च्या पूढे मुदतवाढीस मान्यता देण्यात यावी. महिला बचत गटातर्फे अंगणवाडीत पूरक पोषण आहाराला प्रती लाभार्थी ४.९२ रुपयांप्रमाणे अत्यल्प मोबदला दिला जातो. तो वाढवून किमान १५ रुपये किमान करण्यात यावा. शहरी प्रकल्पातील महिला बचत गटांना सप्टेंबर २०१६ पासूनचा मोबदला देण्यात आला नाही. तो त्वरित द्यावा. अंगणवाडीमध्ये महिला बचत गटातर्फे १ जुलै २०१७ पासून पूरक पोषण आहार पुरवठा सुरू असताना धान्य पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे धान्य पुरवठा त्वरित करावा. पोषण आहार बंद न करता नेहमीकरिता महिला बचत गटाद्वारे सुरू ठेवावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावर केचे यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन महिला बचत गटाच्या समस्या निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी जिजाऊ, रिद्धी-सिद्धी, श्रीकृष्ण, नवदूर्गा, स्मृती, माहुली आदी बचत गटातील पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.