शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनात वाढ

By admin | Updated: June 22, 2014 00:07 IST

मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी या मागणीकरिता विविध संघटनांच्यावतीने आंदोललन करण्यात आले होते. या आंदोलनाला यश आले असून या सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा

वर्धा : मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी या मागणीकरिता विविध संघटनांच्यावतीने आंदोललन करण्यात आले होते. या आंदोलनाला यश आले असून या सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय शासनाने नुकताच जाहीर केला आहे.मिनी अंगणवाडी सेविकेच्या मानधनातील तफावत दुर करा, केंद्र शासनाने केलेली मानधन वाढ त्वरीत लागु करा, मिनी अंगणवाडी सेविकांना उन्हाळ्याच्या सुट्या लागु करा, मिनी अंगणवाडी केंद्रात ३०० लोकसंख्या व १५ लाभार्थी आहेत अशा केंद्राचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करा आदी मागण्यासाठी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने १६ जून २०१४ रोजी मुुुबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. या मागणीची दखल घेत मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली. मागण्यांचे निवेदन महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले होते. या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे उपसचिव चव्हाण, हजारी तसेच उपयुक्त शिंदे उपस्थित होते. तर संघटनेच्या वतीने राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाने, राजश्री सेलार, मंगला इंगोले, शालिनी पवार, बी. के. जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत केंद्र शासनाने केलेल्या मानधनवाढीप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. जुलै २०१३ पासून मानधनात ७५० रुपये वाढ करून थकबाकीसह मानधन देण्यात येईल. आता दरमहा मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा २ हजार ५०० रुपये ऐवजी तीन हजार २५० रुपये मानधन देण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने गायकवाड यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या वाढीचा लाभ महाराष्ट्रातील ९८८० मिनी अंगणवाडी सेविकांना जुलै २०१३ पासून मिळेल. या आंदोलनात १५ जिल्ह्यातील सेविकांनी हजेरी लावली होती. तर वर्धा जिल्ह्यातील मंगला इंगोले यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनी सहभाग घेतला होता. तुटपुंजा वेतनात काम करण्याऱ्या या मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाली असली तरी इतर मागण्यांडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.(शहर प्रतिनिधी)