शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजाचा मागास प्रवर्गात समावेश करा

By admin | Updated: August 30, 2014 02:03 IST

भोई समाजास १९५० पूर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या कायदेशीर सवलती मिळाव्यात,...

वर्धा : भोई समाजास १९५० पूर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या कायदेशीर सवलती मिळाव्यात, अशी मागणी विदर्भ भोई समाज सेवा संंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली. ब्रिटिश शासनाने सन १९३६ मध्ये समाजाला देशाच्या विविध राज्यात अनुसूचित जाती, जमातीच्या सुचीमध्ये समाविष्ट केलेले होते. यामध्ये महाराष्ट्राचासुद्धा समावेश आहे. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० मध्ये नवी राज्य घटना अंमलात आणण्यात आली. त्यानंतर ५ सप्टेंबर १०५० च्या अधिसूचनेनुसार समाजाच्या सवलती काढून या समाजाला भटक्या विमुक्ताच्या वर्गात समाविष्ट केले. एकंदर २२ राज्यामध्ये भोई समाजाला अनुसूचित जाती, जमातीच्या सवलती मिळत आहे. मुन्शी आयोग (१९३७) डॉ. के. बी. अंमोलीकर आयोग ११ आॅगस्ट १९४९, सायमन आयोग (१९४९), कालेलकर आयोग (१९५३), मेहता आयोग (१९५३), ठाकूर आयोग (१९६५), मंडल आयोग (१९७८), रेणके आयोग (२००६) यांनीसुद्धा अनुसूचित जाती, जमातीला मिळत असलेल्या सवलती भटक्या विमुक्तांना मिळाव्यात, अशी शिफारस भारतीय संविधान अनुच्छेद १५४ व १६४ तसेच ३४१ व ३४२ नुसार केलेली आहे. याबाबत शासनाच अनेकवेळा निवेदन देऊन, पंतप्रधानांसह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना भेटून अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ पुणे व विदर्भ भोई समाज सेवा संघ, वर्धाच्या पदाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. बराचसा कालावधी लोटूनसुद्धा शासनाने न्याय दिला नाही. म्हणून अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ व विदर्भ भोई समाज सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या सुचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना देण्यात आले.(शहर प्रतिनिधी)