शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:52 IST

स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचे खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देआठ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांचे खेळ, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाले.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी होते. यांच्यासह स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण सभापती जयश्री गफाट, तर प्रमुख अतिथी म्हणून आ. रणजीतदादा कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, कृषी सभापती मुकेश भिसे, समाज कल्याण सभापती निता गजाम, प.सं.च्या सभापती महानंदा ताकसांडे, प.सं. राजेंद्र डोळसकर, वंदना बावने, सरपंच जगदीश संचेरिया, जि.प. सदस्य नुतन राऊत, धुर्वे, शिक्षणाधिकारी इंगोले, प्राचार्य अडकिने, इंगळे इतर उपस्थित होते.प्रारंभी मशाल प्रज्वलन करून अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आठ तालुक्यातील आठ पथकांनी मान्यवंदना दिली. यानंतर मैदानाचे पुजन करण्यात आले. मान्यवराचे स्वागत सुकळी (बाई) येथील विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने केले. प्रा. शाळा बोरगाव(मेघे) व केंद्रीय शाळा आंजीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. तसेच खेळाडू व पंचाना शपथ देण्यात आली. यावेळी जि.प. शाळा बेलगाव येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या काव्य पुस्तकाचेही विमोचन करण्यात आले. तसेच उड्डान स्पर्धेअंतर्गत दिल्लीवारी करणारी भाविका गुरुनुले उच्च प्राथमिक शाळा धोत्रा(कासार) हिने मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी जि.प. च्या शिक्षण विभाग चांगले कार्य करत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शाळा १०० टक्के डिजीटल करण्याचे आवाहन करून सर्वपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. खा. रामदास तडस यांनी आपल्या मनोगतात क्रीडाला महत्त्वपूर्ण स्थान देत त्यावर प्रत्येकाने लक्ष द्यावे. जि.प. शाळाच्या गुणवत्ता सुधारणेसाठी सर्वपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.स्वागताध्यक्ष जयश्री गफाट यांनी शिक्षण विभागाच्या उपकमाची माहिती दिली. सीईओ नयना गुंडे यांनी क्रीडा हा विद्यार्थी जीवनातला महत्त्वाचा भाग असून तो अविस्मरणीय करण्याचे आवाहन केले.यावेळी जि.प.च्या शाळाना जमनालाल बजाज फाउंडेशन तर्फे शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत महत्त्वाचे कार्य करणारे समन्वयक दिनेश काकडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.प्रास्तविक शिक्षणाधिकारी डॉ. इंगोले यांनी केले. संचालन रफीक शेख यांनी केले तर आभार गट शिक्षणाधिकारी कोडापे यांनी मानले. कार्यक्रमाला पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडा