शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या मनुष्यबळाचा बँक ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:06 IST

परीसरात नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून एसबीआयची स्थानिक शाखा हा एकमेव पर्याय आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या लागतात रांगा : पुरेसे कर्मचारी देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगिरड : परीसरात नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून एसबीआयची स्थानिक शाखा हा एकमेव पर्याय आहे. परंतु, सध्या या बँकेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे बँकेच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ वरिष्ठांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.या बँकेत परीसरातील ५२ गावांमधील हजारो नागरिकांचे खाते आहेत. बँकेत पाच कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत असले तरी कांबळे नामक कर्मचारी गत १५ दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. परिणामी, चार कर्मचाºयांच्या खांद्यावर कामाचा बोझा आला. मात्र, गत आठ दिवसांपासून एक कर्मचारी रजेवर आले. त्यामुळे बँकेतील कमी मनुष्यबळाचा फटका या बँकेतील ग्राहकांना सहन करावा लागत आहे.येथील एसबीआयची शाखा फार जुनी असल्याने या बँकेत अनेकांनी आपले बचत खाते उघडले आहेत. नागरिकांकडून या बँक शाखेच्या माध्यमातून दररोज होणारी उलाढाल ही कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. नोटबंदीच्या आदेशानंतर या बँक शाखेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ती परिस्थिती सध्या नसली तरी बँकेत कर्मचारीच कमी असल्याने विविध अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सदर बँकेत शेतमजुर, विद्यार्थी, जेष्ठ नागरीक आदींची बचत खाते असून बँकेत दररोज नागरिकांची गर्दी होत आहे.बँकेत कार्यरत कर्मचाºयांवर ओढावलेला कामाचा अतिरिक्त ताण व नागरिकांना होणाऱ्यां अडचणी यातून मार्ग काढण्यासाठी बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ येथे पुरेसे मनुष्यबळ देत नागरिकांना व बँक कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी बँकेचे ग्राहक असलेल्या परिसरातील नागरिकांची आहे.बँकेतील अपुºया मनुष्यबळाची माहिती आपण वरिष्ठांना दिली आहे. ते लवकरच यावर काही उपाययोजना करतील अशी आपणाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे.- राजेंद्र बोरकर, शाखा व्यवस्थापक, एस.बी.आय. गिरड.