शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साखरेप्रमाणे कापसावरही आयात शुल्क लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:30 IST

बाजारात साखरेचे दर पडताच ऊस उत्पादक, साखर कारखानदारांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून केंद्र शासनाने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क सुरू केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : १५ दिवसांत शेतकऱ्यांकडील सर्व कापूस व्यापाऱ्यांच्या घशात जाणार

आॅनलाईन लोकमतरोहणा : बाजारात साखरेचे दर पडताच ऊस उत्पादक, साखर कारखानदारांची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून केंद्र शासनाने साखरेवर १०० टक्के आयात शुल्क सुरू केले. यातून ऊस उत्पादक व साखर कारखानदारांना आर्थिक दिलासा मिळाला; पण पंधरवड्यात कापसाचे भाव प्रती क्विंटल ५०० रुपये घसरत असताना कापसावर आयात कर लादला जात नाही. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. याकडे लक्ष देत कापसावर आयात कर लावण्याची मागणी होत आहे.कापूस गिरणी मालकांना शून्य टक्के आयात शुल्कावर कापूस आयातीची मुभा देण्यात आली आहे. कापूस आयातीवरील शुल्क कधी वाढविणार, हा प्रश्नच आहे. कापूस पूर्णत: व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यावर आयात शुल्क लावणार काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.कापूस गाठींना उठाव नाही, सरकीचे भाव पडले. जिनिंग प्रक्रिये दरम्यान सरकीची भुकटी होते. कापसाच्या रूईची प्रत घसरली, आदी कारणे पूढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी चांगल्या कापसाला ५२०० ते ५३०० रुपये मिळणारा भाव ४८०० रुपयांवर आणला. मागचा कापूस घेण्यास व्यापारी नकारच देत आहे. मागच्या कापसाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल वेचाईसाठी शेतकऱ्याने खर्ची घातले. हा कापूस घरी साठविणे आरोग्यास हानीकारक असल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. अशावेळी व्यापारीही कापूस खरेदीस उदासिनता दाखवित आहे. असे असताना केंद्र शासनाने कापूस आयातीवर कोणतेही शुल्क न आकारता आयातीस मुभा देणे कापूस उत्पादकांच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.शेतकऱ्यांचा सर्व कापूस व्यापारी वर्गाकडे गेल्यानंतर आयातीवर आयात शुल्क लावण्यापेक्षा केंद्र शासनाने त्वरित आयात शुल्क लावून कापूस उत्पादकांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी मूल्य आयोगालाही अद्याप यश नाहीकापूस आयातीवर आयात शुल्क लावण्याची गरज आहे, हे केंद्र शासनाला पटवून देण्यासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे; पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आल्याचे दिसत नाही. आणखी १५ दिवस हे चित्र कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा सर्व कापूस व्यापाऱ्यांच्या गोदामात जमा होणार आहे. यानंतर केंद्र शासनाने कापसावरील आयात शुल्क वाढविले तर ते व्यापाऱ्यांनाच अधिक फायद्याचे ठरणार आहे. शासन मात्र आम्ही कापूस उत्पादकांची मागणी पूर्ण केल्याचे छाती ठोकून सांगणार आहे, हे निश्चित. ही बाब टाळून व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी कापसावर त्वरित आयात शुल्क लावणे गरजेचे झाले आहे.