शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना पटवून दिले जलसंवर्धनाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:49 IST

पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

ठळक मुद्देवॉटर कपची तालुकास्तरीय कार्यशाळा : तहसीलदारांसह मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पाणी फाऊनडेशनच्यावतीने आयोजित सत्येमय जयते वाटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय कार्यशाळा येथील विद्या भारती महाविद्यालयात पार पडली. यावेळी उपस्थितांना तज्ज्ञ मान्यवरांनी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेंद्र सोनुने, गटविकास अधिकारी डॉ. संघमित्रा कोल्हे, डॉ. उल्लास जाजू, दौलत, डॉ. प्रा. संजय कानोडे, भरत घेर, अशोक सूर्यवंशी, अमीत दळवी आदींची उपस्थिती होती.मार्गदर्शन करताना तहसीलदार सोनुने यांनी पाणी फाऊनडेशन अंतर्गत सत्येमय जयते वाटर कप -३ स्पर्धेमुळे तालुक्यातील गावांना पाणीदार करण्याची संधी चालुन आलेली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत तालुक्यातील ७६ गावांनी सहभाग नोंदविला आहे. ही प्रक्रिया अधीक गतिमान करण्यासाठी गावातील लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. या प्रक्रिये दरम्यान गावात झालेल्या कामाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची जोड देता येईल. त्यातून गावाची प्रगती नक्कीच साधता येईल. आपण सर्व मिळून एक व्यापक पाण्याची लोक चळवळ बनवू या, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.डॉ. उल्लास जाजू म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, सध्या त्याने सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. रासायनिक शेती शेतकºयांची उडचण वाढविणारीच ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सेंद्रीय शेती करणाºयांना प्रोत्साहनही देणे गरजेचे आहे. शेतकरी समृद्ध होण्यासाठी त्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविणे गरजेचे आहे. संपूर्ण परिसर पाणीदार बनविण्याची संधी ग्रामस्थांपर्यंत चालून आली आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. पाणी फाऊनटेशनच्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांनी सांगितले की, दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. या प्रक्रियेतून आपल्याला दुष्काळाकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग नक्कीच मिळेल. सरकारी पातळीवरून आपल्याला योग्य अशी मदत मिळेल. शोष खड्डे, रोपवाटिका, शेततळे आदी कामे आपण श्रमदानातून केली पाहिजे. तेव्हाच हा उपक्रम एक लोकचळवळ म्हणून पुढे येईल आणि आपले गाव पाणीदार बनेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी काकडदरा येथील वाटर हिरोज दौलतभाऊ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अशोक सूर्यवंशी यांनी केले. संचालन भरत घेर यांनी केले तर आभार किरण यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य आदींची उपस्थिती होती.