शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘पत्नीच्या नावे घर’ निर्णयाची ६० दिवसांत अंमलबजावणी करा

By admin | Updated: August 17, 2016 00:48 IST

ग्रा.पं. क्षेत्रातील सर्व घरांवर पुरूषांच्या बरोबरीने त्याच्या पत्नीची मालकी हक्क पत्रात नोंद करा, असा शासन निर्णय आहे.

धरणे आंदोलन : कविताचे घर जिल्हाधिकाऱ्यांनी परत करण्याची मागणी वर्धा : ग्रा.पं. क्षेत्रातील सर्व घरांवर पुरूषांच्या बरोबरीने त्याच्या पत्नीची मालकी हक्क पत्रात नोंद करा, असा शासन निर्णय आहे. जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. परिणामी, अनेक महिलांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागते. परडा येथील कविता मुंगले हिलाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. तिला जिल्हाधिकाऱ्यांनीच घर परत करावे, अशी मागणी करीत समता परिषदेने मंगळवारी धरणे आंदोलन केले. दोन वर्षांपूर्वी ग्रा.पं. ला घरावर पतीच्या बरोबरीने आपले नाव नोंदवावे, अशी लेखी विनंती केली होती; पण त्यांनी तिचे ऐकले नाही. परिणामी, व्यसनी नवऱ्याने तिला माहिती न होऊ देता घर विकले. दोन लहान मुलांसह तिला घराबाहेर काढले. याला प्रशासनच जबाबदार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रा.पं. मध्ये शोध मोहीम घेऊन ६० दिवसांच्या आत सर्व घरांवर पुरूषांच्या बरोबरीने त्यांच्या पत्नीच्या नावांची नोंद मालकी हक्क पत्रांवर करावी व ते मालकी पत्र महिलांना द्यावे. कविताचे घर जिल्हाधिकारी व सर्व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारीमुळे विकले गेले. यामुळे जिल्हाधिकारी व जि.प. सीइओ यांनी पुढाकार घेऊन कविताच्या घराची विक्री रद्द करावी. तिला तिचे घर सन्मानाने परत करावे, अशी मागणी करण्यात आली. असे न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी म. फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे उपस्थित होते. आंदोलनाला किसान अधिकार अभियान, राष्ट्रवादी किसान सभा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने पाठींबा देत सहभाग घेतला. धरणे आंदोलनात कविता मुंगले, अविनाश काकडे, किशोर माथनकर, राकाँ. जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, महिला राकाँ अध्यक्ष शरयू वांदिले, महिला काँग्रेस अध्यक्ष हेमलता मेघे, विजय मुळे, निळकंठ पिसे, सुधीर पांगूळ, निळकंठ राऊत, अंबादास चौधरी, शैलेश येळणे, प्रा. खलील खतिब, शारदा केने, सुमन राहणे, नंदिनी राऊत आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)