शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे नावे घर, कायद्याची अंमलबजावणी करा

By admin | Updated: August 14, 2016 00:29 IST

महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २००३ ला शासन निर्णय काढून, ग्रामीण भागातील विवाहित महिलांमध्ये, सुरक्षिततेची भावना ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संघटनांचा धरणे आंदोलनाचा इशारा वर्धा : महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २००३ ला शासन निर्णय काढून, ग्रामीण भागातील विवाहित महिलांमध्ये, सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी, त्यांना पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मुलभूत गरज मानली. त्या अनुषंगाने, घर ही प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानुन व स्त्रीयांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी, पतीच्या नावे असलेल्या घराची नोंद, पती आणि पत्नी या दोघांच्याही संयुक्त नावे करण्यासाठी शासन आदेश काढला. पण तेरा वर्षात याची योग्य अंमलबजावणीच झालेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी एका निवेदनातून विविध संघटनांनी केली आहे.े अनेक महिलांना त्यांचा कादेशीर अधिकार असतानासुद्धा आपल्या हक्काच्या घराला मुकावे लागले. यापुढे ते होवू नये, ग्रामपंचायत क्षेत्रामधल्या प्रत्येक पुरुषांच्या घरावर त्यांच्या पत्नीच्या नावाची नोंद व्हावी, यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना सादर केलेल्या निवेदनात, पत्नीचे नावे घर या शासन आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश, सर्व महिला व बालविकास विभाग, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच यांना दिले. भारतीय राज्यघटना, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले पत्नीच्या बाबतीत पतीच्या संपत्तीत दिलेले अधिकार आणि पतीने, कुठलीही व्यसनाधिनतेने किंवा मतभेदामधून, पत्नीला तिच्या राहत्या घराबाहेर हाकलून देवू नये, किंवा पत्नीच्या सहमतीशिवाय, तिचे राहते घर विकून, तिला घराबाहेर जाण्यास भाग पाडू नये, हा त्या मागील हेतू होता. या धरणे आंदोलनाला महात्मा फुले समता परिषद, किसान अधिकार अभियान, राष्ट्रवादी किसान सभा, वर्धा जिल्हा काँग्रेस कमेटी,वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी महिला काँगे्रस, जिल्हा महिला काँग्रेस यांनीसुद्धा पाठींबा दिलेला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)