शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

तिगाव ते आमला रस्त्याचे बांधकाम त्वरित करा

By admin | Updated: January 17, 2015 02:22 IST

शेतकरी, शेतमजूर नागरिकांना सोयीच्या ठरणाऱ्या तिगाव ते आमला रस्त्याचे तात्काळ बांधकाम करावे, अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना ग्रामपंचायत कार्यालय...

वर्धा : शेतकरी, शेतमजूर नागरिकांना सोयीच्या ठरणाऱ्या तिगाव ते आमला रस्त्याचे तात्काळ बांधकाम करावे, अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना ग्रामपंचायत कार्यालय तिगावच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील ग्रामसभेच्या ठरावाची सत्यप्रत व गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन विभागाला सादर करण्यात आले आहे.तिगाव ते आमला या जुन्या रस्त्याच्या आजूबाजूला अल्पभूधारक शेतकऱ्याच्या जमिनी आहेत. त्या रस्त्यावर झाडेझुडपे वाढलेली आहे. दुसरीकडे वीटभट्टीधारक या रस्त्याने माती व मुरूम अनेक वर्षापासून नेत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. अशा परिस्थितीत रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासह शेतमाल घरी आणण्यासाठी अडचणींचे जात आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ होणे अत्यावश्यक आहे. दुसरीकडे माडा हे जागृत देवस्थान असून राज्य शासनाने याला तिर्थस्थळाचा दर्जा दिला आहे. या स्थळी झाडगाव, दिग्रस, उमरी तिगाव, रोठा, आमला, दहेगाव, लोनसावळी, वायफळ, डोरली, धामणगाव, वाठोडा येथील भक्तगण स्वयंपाकासाठी येतात. लोनसावळी, डोरली, धामणगाव, वाठोडा येथील नागरिकांना वर्धेला जाण्यासाठी प्रथम वायफडला यावे लागते. धामणगावरून आमलापर्यंत पक्का रस्ता झाला आहे. याच रस्त्याला तिगाववरून नियोजित होणारा रस्ता जोडल्यास ७ ते १० कि.मी.चे अंतर कमी होऊ शकते. त्यामुळे तिगाव ते आमला रस्त्याचे कामही तात्काळ करण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात सरपंच शीतल मसराम, जि.प. सदस्य मनोज चांदूरकर, उपसरपंच साधूजी इरपाते, आमलाचे सरपंच मोहन इंगळे, मंगला महल्ले उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)