शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोबाईल मेमोग्राफीतून स्तनांच्या आजाराचे तत्काळ निदान

By admin | Updated: July 8, 2015 02:20 IST

महिलांमध्ये स्तनाचे आजार वाढीवर आहे. हे आजार उपचाराची सीमा ओलांडल्यानंतरच लक्षात येतात. यामुळे तो बरा होईलच याची शाश्वती राहात नाही.

संजय मीना : ग्रामीण महिलांना मिळणार मोफत उपचारवर्धा : महिलांमध्ये स्तनाचे आजार वाढीवर आहे. हे आजार उपचाराची सीमा ओलांडल्यानंतरच लक्षात येतात. यामुळे तो बरा होईलच याची शाश्वती राहात नाही. या आजारापासून महिलांना वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोबाईल मेमोग्राफी सेवेच्या माध्यमातून घडणार आहे, अशी माहिती जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि रोटरी क्लब आॅफ गांधी सिटीच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मोबाईल मेमोग्राफी सेवा वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना मिळणार असून यात जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा सहभाग आहे, असेही मीना म्हणाले. मोबाईल मेमोग्राफी सेवा जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्कलमध्ये किमान एक आठवडा सेवा देणार आहे. त्या अंतर्गत असलेले ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्र, उपकेंद्रस्तरावरील महिलांची तपासणी या माध्यमातून करण्यात येणार आहे. तपासणीच्या वेळीच संबंधित महिलांना स्तनाचा कर्करोग झाला वा नाही याचे निदान होणार आहे. ही सेवा मोफत असणार आहे. यानंतर सदर महिलेवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहे. या सेवेपासून ग्रामीण भागातील एकही महिला वंचित राहू नये, यासाठी जि.प. आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आशा वर्करला विशेष प्रशिक्षण दिले देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनजागृती घडवून आणता येणार असून महिलांना ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनी दिली. यावेळी जि. प. उपाध्यक्ष विलास कांबळे, आरोग्य सभापती मिलिंद भेेंडे, माजी जि.प. सभापती नितीन देशमुख, रोटरी क्लबचे निर्वाचित प्रांतपाल महेश मोकलकर, आरोग्य विभागाचे डॉ. डवले, डॉ. मीनाक्षी येवला, संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)मोबाईल मेमोग्राफी सेवा वर्धेत येत्या लोकसंख्या दिनापासून महिलांसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. देशातील दुसरी अत्याधुनिक मोबाईल मेमोग्राफी सेवा आहे. यापूर्वी पुणे येथे अशी सेवा रूज झाली होती. मात्र ती अयशस्वी ठरली. वर्धेत ही सेवा रूजू करण्यापूर्वी त्या अपयशामागील बाबींचा अभ्यास करुन त्या दूर करण्यात आल्या आहे. ५० लाख रुपयांची मेमोग्राफी मशीन बेल्झियममधून आणलेली आहे. इतर खर्च ५० लाख रुपये असा एक कोटींचा हा उपक्रम असून याचा लाभ वर्धा जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे निर्वाचित प्रांतपाल महेश मोकलकर यांनी दिली.