शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैधपणे वृक्षांची केली कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:14 IST

रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या वृक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पूढे करीत कंत्राटदाराकडून थेट अवैध पद्धतीने वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार टाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावर बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देटाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावरील प्रकार : वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला फाटा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या वृक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पूढे करीत कंत्राटदाराकडून थेट अवैध पद्धतीने वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार टाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावर बघावयास मिळत आहे. ५ किमीच्या मार्गावरील मोठी वृक्ष अवैधपणे तोडण्यात आली असून या प्रकारामुळे वृक्षसंवर्धनाच्या उद्देशालाच फाटा मिळत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याची गरज आहे.देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) गावालगतच्या टाकळी (चनाजी) आणि बोपापूर (दिघी) या ५ किलोमीटरच्या अंतरावरील रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेली बाभुळीची झाडे तोडण्याचा सपाटा गेल्या तीन दिवसांपासून सुुरु आहे. याबाबत काही वृक्षप्रेमी ग्रामस्थांनी विचारणा केली असता कंत्राटदाराकडून उडवा-उडवीचे उत्तरे देण्यात आली. उल्लेखनीय म्हणून या मार्गावरील केवळ मोठी आणि सरळ झाडेच कापली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गत तीन दिवसांत सुमारे ४० मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. सुरू असलेल्या या वृक्ष कत्तलीला कुणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न उपस्थित करीत अवैध वृक्षतोड करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे.केवळ ३० वृक्ष तोडण्याचा दिला कंत्राटया मार्गावरील ३० मोठी वृक्ष ही रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी असल्याने ती तोडण्याचा कंत्राट दिला आहे;पण कंत्राटदार अधिकचे वृक्ष तोडत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला काम थांबविण्याचे सांगण्यात आले आहे. सध्याही तसेच होत असेल तर सुरू घटनास्थळी जाऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवळीचे कनिष्ठ अभियंता भूत यांनी दिली.वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात नाही-सोनटक्केटाकळी (चनाजी) ते बोपापूर मार्गालगतचे वृक्ष आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात. त्यामुळे या प्रकाराबाबत आमच्याकडे काही माहिती नाही, असे वनपाल सोनटक्के यांनी सांगितले.