शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देवळी-पुलगाव मार्गावर अवैध वृक्षकटाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:17 IST

देवळी-पुलगाव रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या बाभळीच्या झाडावर कुºहाड चालत असतानाही सार्वजनिक बांधकाम .....

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : पर्यावरणाला हानिकारक

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : देवळी-पुलगाव रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या बाभळीच्या झाडावर कुºहाड चालत असतानाही सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे याकडे लक्ष नाही काय असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे.हा प्रकार गत एक महिन्यापासून सुरू आहे. मात्र याला पायबंद घालण्यात आला नाही. अवैधरित्या वृक्षकटाई करणारे एक दिवस काम करतात नंतर पुढील पाच दिवस काम बंद ठेवले जाते. हा नित्यक्रम असून यामुळे पर्यावरणाची अपरिमीत हानी होत आहे. हा गोरखधंदा परिसरात जोमाने सुरू असताना संबंधीत विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रस्त्यालगतची मोठमोठी बाभळीची झाडे धराशाही होत आहे. वृक्षकटाई काही दिवसाच्या अंतराने होत असल्यामुळे ये-जा करणाºयांच्या ही बाब सहजरित्या लक्षात येत नाही. मशीनद्वारे कटाई करण्यात येत असे, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येते. सदर प्रकाराची माहिती बांधकाम विभागाला देण्यात आली. तरी याकडे दुर्लक्ष केले. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता एकीकडे शासन वृक्षलागवड मोहीम राबवित आहे. यावर कोट्यवधी रूपये खर्च होत आहे. समाजकंटकाकडून वृक्षकटाई केली जाते तरी संबंधीत दुर्लक्ष करीत आहे.कडक कारवाईची ग्रामस्थांची मागणीसदर वृक्षकटाई खुलेआम होत असल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाºयांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला तरी योग्य उत्तर दिले जात नव्हते. शासकीय काम असल्याचे सांगून टोलविण्यात आले. सदर घटनेकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.सदर परिसरातील काही झाडांना कटाईची परवानगी दिली आहे. मात्र अवैध वृक्षकटाई होत असेल तर अशा घटनांबाबत वरिष्ठांशी बोलून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.- अनिल भूत,अभियंता, सां.बा. उपविभाग, देवळी.