शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खुणी घाटावर पोकलँडद्वारे रेतीचे अवैध उत्खनन

By admin | Updated: February 8, 2017 00:41 IST

तालुक्यातील वणा नदीवर खुणीघाटासह मेणखात व सावंगी (देर्डा) येथील रेतीघाट शासनाने लिलाव केले.

महसूल प्रशासनाची डोळेझाक : शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना; पोलीस यंत्रणाही मूग गिळून सुधीर खडसे  समुद्रपूर तालुक्यातील वणा नदीवर खुणीघाटासह मेणखात व सावंगी (देर्डा) येथील रेतीघाट शासनाने लिलाव केले. या घाटाचा कंत्राट घेताना शासकीय निविदेत असलेले नियम व शर्तीला बगल देत अवैधरितीने या घाटावर पोकलँडद्वारा व नावेचा उपयोग करून रेती उपसा करण्यात येत आहे. या नदीपात्रातून २० फुट खोल खड्डे करून रेती उपसा सुरू आहे. याकडे मात्र महसूलसह पोलीस विभागाकडून डोळेझाक होत आहे. या घाटावरून दिवसरात्र २०० ते ३०० ब्रास रेतीचा उपसा होत आहे. या मार्गाने दररोज १०० ते १५० टिप्पर चालत आहे. एका टिप्परमध्ये ४०० फुट रेतीचह वाहतूक होत आहे. एवढी रेती घेवून हे टिप्पर मांडगाव येथील रस्त्यांवरून सतत धावत आहेत. नदीच्या पात्रामध्ये नाव घालून २० फुट खोलीपर्यंत रेतीचा उपसा सुरू आहे. नदीच्या पात्रात मोठमोठे डोह तयार झाले आहे. गुरे-ढोरे व गावातील लहान मुले खोल पाण्यात गेल्यास जीवहानीची भीती वाढली. या रेतीघाटाच्या व्यवसायात रेतीचा उपसा होवून पैसा मुरत असल्याची चर्चा आहे. गत वर्षी सावंगी (देर्डा) येथील तत्कालीन तहसीलदार सचिन यादव यांनी दोन नावांसह पोकलँड जप्त केले होते. यावेळी सदर व्यावसायिकाला ६ लाखांचा दंड आणि १० वर्षे रेतीघाट व्यवसायात येण्यास बंदी घालण्यात आली होती. सध्या उपसा होत असलेला रेतीघाट मांडगाव येथून दोन कि़मी. अंतरावर असून येथे पटवारी व मंडळ अधिकाऱ्याचे कार्यालय आहे. असे असताना त्यांनी या रेतीघाटावर येत भेट देत पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. हा गोरखधंदा गत नऊ महिन्यापासून सुरू आहे. यावर प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे. रेतीच्या उपस्यात मुरतोय पैसा जिल्ह्यात रेती घाटाच्या व्यवसायात लिलावापासूनच आर्थिक व्यवहार होत असल्याची ओरड होत आहे. याच व्यवहारापोटी वर्धेत नियम डावलून रेतीचा उपसा होत आहे. वर्धेतच नव्हे तर राज्यात या व्यवसायातून काही निष्ठावाण अधिकारी सोडले तर अनेक गलेलठ्ठ झाले आहेत. यामुळे या रेतीच्या उपस्यात मोठ्या प्रमाणात पैसा मुरत असल्याची सर्वसामान्यांकडून ओरड होत आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.