शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

कन्नमवारग्राम परिसरात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय फोफावला

By admin | Updated: March 2, 2017 00:41 IST

तालुक्यातील कन्नमवारग्राम हे गाव महत्त्वाचे ठिकाण आहे. या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या जवळपास आहे.

पोलीस अधीक्षकाकडे तक्रार : कडक अंमलबजावणीची मागणी कारंजा(घा.) : तालुक्यातील कन्नमवारग्राम हे गाव महत्त्वाचे ठिकाण आहे. या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या जवळपास आहे. या जंगलव्याप्त गावाचा परिसरातील १० ते १२ गावांसोबत संपर्क येतो. येथे सध्या अवैध दारूविक्रीचा धंदा फोफावला आहे. त्यामुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून दारूविक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. या गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र काही दारूविक्रेते येथे दारूचा गाळप करतात. तर देशी व विदेशी दारूची लगतच्या जिल्ह्यातून तस्करी केली जाते. जंगलमार्गे दारूची वाहतूक करुन चा माल अन्यत्र पोहचविला जातो. हा प्रकार गत दहा वर्षांपासून सुरू आहे. या गावात ठोक दराने दारूचा पुरवठा होतो अशी माहिती आहे. कन्नमवारग्राम येथील हातभट्टीची दारू प्रसिद्ध आहे. यावरुन येथील दारू व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना करता येईल. या विक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश नाही. या दुर्गम भागात कोणतीच कारवाई होत नसल्याने दारूविकेत्यांचे चांगलेच फावते. या अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. याला वेळीच प्रतिबंध केला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. गावातील किराणा दुकानातून दिवसाला १ ते २ क्विंटल गुळाची विक्री केल्या जाते. या गुळाचा वापर कशासाठी होतो, याची चौकशी झाली पाहिजे. या दारूविक्रीमुळे गावात तंटे वाढले आहे. युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. गावात दारूविक्री जोमात सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र सुस्त आहे. गुरूवारी येथे बाजार असतो. त्यादिवशी बसस्टॉपपासून ते बाजारापर्यंत खुलेआम दारूविक्री सुरू असते. बाजारात खरेदीकरिता आलेल्या महिलांचा याचा त्रास होतो. गावातील युवा पिढी दारू गाळप करण्याच्या व्यवसायाकडे वळत आहे. दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)