शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल चोरीसह सुविधांकडेही दुर्लक्ष

By admin | Updated: July 17, 2017 02:00 IST

सर्वत्र ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चर्चेत असताना वर्धेतील एकाही पेट्रोलपंपाची तपासणी झाली नाही.

जिल्ह्यात ५० पंप : नागरिकही अधिकारांबाबत अनभिज्ञरूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वत्र ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चर्चेत असताना वर्धेतील एकाही पेट्रोलपंपाची तपासणी झाली नाही. शेजारी जिल्ह्यात या तपासणी चमुने कारवाई केली; मात्र यातून वर्धेत नाही. यामुळे शासनाच्या तपासणीत वर्धा जिल्हा नव्हता काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पंपावरील पेट्रोल चोरीच्या प्रकारासह आवश्यक सुविधांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील आठ तालुके असून एकूण ५० पेट्रोलपंप आहेत. या पंपावरून पेट्रेल आणि डिझेलची विक्री होते. या विक्री दरम्यान पेट्रोल आणि डिझेल चोरीची अनेक प्रकरणे काही पंपावर घडली आहेत. मात्र कारवाई नसल्याने हा प्रकार सुरूच असल्याचे दिसते. याला नागरिकांत नसलेली जनजागृती हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. वर्धेतील नागरिकांना पंपावर आवश्यक सुविधांबाबत विचारणा केली असता त्यांना मोजक्याच बाबी माहीत असल्याचे दिसून आले. शासनाच्या निर्णयानुसार पेट्रोल पंपावर एकूण ११ सुविधा असणे आवश्यक आहे. या सुविधा कोणत्या या संदर्भात मात्र एकाही नागरिकाला परीपुर्ण माहिती नसल्याचे दिसून आले. पंपावर असलेल्या सुविधा म्हणजे नागरिकांचे अधिकार, या अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञ नसल्याचे दिसून आले आहे. आवश्यक सुविधा पुरविण्यात वर्धेतील काही पंप सक्षम असल्याचे दिसून आले तर काहींनी या सुविधा कशाला, असे म्हणत याकडे पाठ केल्याचे दिसून आले आहे.शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सर्वच आवश्यक सुविधा पेट्रोल पंपावर देण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडूनच कधी या सुविधांबाबत विचारणा होत नाही.- संजय राजपाल, पंप मालक, वर्धापंपावर येणाऱ्या ग्राहकांकरिता आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याची नुकतीच कंपनीच्यावतीने पाहणी झाली आहे. यात त्रूटी असती तर त्यांच्याकडून पंपाला नोटीस बजावण्यात आली असती. तसे झाले नाही. - सुनील ब्राह्मनकर, पंप मालक, पुलगाव.सुरक्षेच्या दृष्टीनेही उपाययोजना नाहीवर्धा शहरात एकूण १८ पंप आहे. यातील काही पंपांवचर आवश्यक सुविधा आहे तर काही पंपांवर त्या नसल्याचे दिसून आले आहे. या सोबतच असलेल्या पंपांवर सुरक्षेच्या दृष्टीनेही काही विशेष सुरक्षा नसल्याचे दिसून आले आहे. वर्धेतील काही पंपांवर तर सीसीटीव्हीचाही नियम धाब्यावर बसविला जात असल्याचे दिसते.