शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला न मिळाल्यास मलातपूर तलावात जलसमाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:14 IST

मलातपूर तलावाकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या; पण १९९९ पासून त्यांना मोबदला देण्यात आलेला नाही.

ठळक मुद्दे२२ शेतकऱ्यांचा इशारा : १९९९ पासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत, दोन वेळा केले होते प्रकरण बंद

आॅनलाईन लोकमतआर्वी : मलातपूर तलावाकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या; पण १९९९ पासून त्यांना मोबदला देण्यात आलेला नाही. यामुळे शासनाने एक महिन्यात हक्काच्या जमिनीचा मोबदला दिला नाही तर ज्या तलावाच्या कालव्यासाठी जमीन संपादित केली, त्याच मलातपूर तलवात जलसमाधी घेऊ असा गंभीर इशारा तालुक्यातील २२ शेतकऱ्यांनी दिला आहे.मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंधारणमंत्री, शासनाचे सचिव, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपकार्यकारी अभियंता, विरोधी पक्षनेते आदींना या शेतकऱ्यांनी स्वाक्षरीसह निवेदन पाठविले आहे. या निवेदनामुळे शासन, प्रशासनात खळबळ माजली आहे. शासनाने १९९९ मध्ये आर्वी तालुक्यातील रोहणानजीक मलातपूर तलावासाठी वाई आणि शिरपूर या मौजातील २२ शेतकºयांची वडिलोपार्जित जमीन अधिग्रहीत केली. यात शिरपूर मौजातील १३ आणि वाई मौजातील ९ शेतकऱ्यांच्या शेतीचा समावेश आहे. १९९९ मध्ये मलातपूर लघुपाटबंधारे तलावासाठी जमीन संपादित केल्यावर लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांनी शेतकऱ्यांकडून राजीनामा पत्र लिहून घेतले; पण १९९९ ते २००९ पर्यंतच्या दहा वर्षांत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. शासनाने १० वर्षांत मोबदला दिला नाही. प्रतीक्षेची १० वर्षे संपल्यानंतर २०१० मध्ये गजानन पाटेकर वाई व केशव मांढरे शिरपूर यांच्या नेतृत्वात इतर २० शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, संबंधित अधिकारी, अधीक्षक यांच्या भेटी घेत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाºयांना संपूर्ण माहिती व प्रस्ताव मागितला. अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा पाठपुरावा केला. यानंतर २०१० मध्ये काही अंशी रक्कम मिळाली; पण त्यानंतर पुन्हा हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. पाच वर्षांत दोन वेळा हे प्रकरण बंद केल्यानं शेतकºयांनी मंत्रालय मुंबई, विभागीय कार्यालय नागपूर, जिल्हाधिकारी कार्यालय एसडीओ आर्वी, तहसीलदार आदी ठिकाणी शेतीच्या हक्क, मागणीसाठी अधिकाऱ्याचे उंबरठे झिजविले; पण उपयोग झाला नाही. यामुळे २२ शेतकऱ्यांनी आता निर्णायक भूमिका घेत मोबदला न मिळाल्यास मलातपूर तलावातच जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासन मात्र हादरले आहे.जिल्हास्तरीय समितीमार्फतही कार्यवाही शून्यचमहाराष्ट्र शासनाच्या २७ मे २०१५ रोजी प्रसिद्ध अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील भागाकरिता २.०० गुणक लागू झाला होता. तत्पूर्वी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार थेट खरेदीने जमिनीत ताब्यात घेण्याकरिता जमिनीचे दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समिती स्थापित करण्यात आली होती; पण या समितीने कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे पुन्हा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेत समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे.