शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

एमबीबीएस मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टरांकडून सेवा पुरवा

By admin | Updated: September 21, 2016 01:08 IST

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने नुकत्याच घेतलेल्या

उपजिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन : उपजिल्हा रुग्णालयात १८ डॉक्टरांची गरज हिंगणघाट : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी शासनाने नुकत्याच घेतलेल्या एमबीबीएस पदव्युत्तर डॉक्टरांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्यास बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करून नागरिकांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा पुरविण्याची मागणी आपचे मनोज रूपारेल व कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांना निवेदन सोपवून शासनाला केली आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त १० जिल्ह्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी ४१३ डॉक्टर परभरती साठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात वर्धा जिल्ह्यातील २६ डॉक्टरांची निवड करून त्यांची माहिती वरिष्ठांकडे पाठविण्यात आली. याला महिन्याचा कालावधी होत असला तरी नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाही. हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात १८ डॉक्टरांची गरज असताना केवळ चार डॉक्टरांचे सहकार्याने १०० खाटाचे रुग्णालय २४ तास सेवा देत आहे. येथे १००० ते १२०० रुग्ण तपासणी करीत आहे. या रुग्णालयातील पाच जागा कागदोपत्री रिक्त असून नऊ डॉक्टर विविध कारणांनी गैरहजर आहेत. यापैकी चार डॉक्टर गत दोन वर्षांपासून उच्च शिक्षणासाठी गेले आहे. नऊ रिक्त जागावरील पद भरती अडचणीत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले आहे. अशा स्थितीत येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडली असून याकडे जिल्हा प्रशासनाने व शासनाने लक्ष देवून पदभरती करून कायम स्वरूपी तोडगा कारण्याची मागणी केली आहे. येत्या दहा दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना आपचे मनोज रूपारेल, भाऊराव कोटकर, प्रमोद जुमडे, जगदीश शुक्ला, अखिल धाबर्डे, नरेंद्र चुंबळे, कमलाकर बोकडे, राजू अरगुळे, सलमान रंगरेज, बाबु गिरी, भाऊ जवादे, पलाश दुबावारे, विनोद कुंभारे, अमय पोहनकर, कपील थूल, भारत पवार, संजय हावगे, गजानन येन्नेवार, संदेश थूल, फहीम भाई, प्रफुल क्षिरसागर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)