शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मिल बंद केल्यास रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:08 IST

येथील १२० वर्षे जुन्या आर. एस. आर. मोहता स्पिनिंग व विव्हिंग मिल्स येथील कामगारांची द्वार सभा शुक्रवारी पार पडली. मिल बंद केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला.

ठळक मुद्देकामगारांचा इशारा : द्वारसभेला शेकडो कामगार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील १२० वर्षे जुन्या आर. एस. आर. मोहता स्पिनिंग व विव्हिंग मिल्स येथील कामगारांची द्वार सभा शुक्रवारी पार पडली. मिल बंद केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला.कापड उद्योगाने भविष्यात तोट्यात वाढ होत गेल्यास कंपनीचे काही विभाग अर्धे तर काही विभाग पूर्णत: बंद करावे लागतील अशी सूचना प्रसिद्ध केली आहे. या अनपेक्षित सूचनेमुळे कामगार वर्गात रोष निर्माण होत आहे. शिवाय त्यांच्यात खळबळ उडाली असून मिल प्रशासनाने मिल बंद केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी दिला. मागील ११ महिन्यांच्या कालावधीत बाजार भावात झालेली घसरण व मालाची मागणी कमी झाल्याने कंपनीला १० कोटी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शिवाय त्याचा आर्थिक भुर्दंडही कंपनीवर पडत आहे. यातून सावरण्यासाठी कामगार वर्गाने उत्स्फूर्तपणे काम करून मालाची गुणवत्ता वाढवून झालेला तोटा कमी करावा, अन्यथा वेळेवर पगार देणे कठीण होण्याची शक्यता वर्तविली आहे. कामगारांनी आपली कामे निष्ठेने करून कंपनीला रोजच्या व्यवहारात सहकार्य करावे, अन्यथा कारवाईचा इशारा कंपनी व्यवस्थापनाने लेखी पत्राद्वारे दिला आहे. या संदर्भात स्थानिक मोहता मिल चौकात शुक्रवारी दुपारी कामगारांची द्वार सभा पार पडली. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, नाना हेडावू, दीपक भरदे, प्रवीण चौधरी, गुलाब पिंपळकर, प्रवीण जनबंधु, शकीलभाई, राजू वैरागडे, दिवाकर डफ, योगेश जंगले, प्रभाकर शेंडे अशोक आंबटकर आदींची उपस्थिती होती.