शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाहने उचलून नेल्यास अधिक दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:13 IST

शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेद्वारे विविध प्रकारे कार्यवाही केली जाते. याचा वाहन धारकांना त्रास होत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलून नेली जातात.

ठळक मुद्देटोर्इंग व्हॅनच्या खर्चासाठी उपाययोजना : अतिरिक्त ७० रुपये आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेद्वारे विविध प्रकारे कार्यवाही केली जाते. याचा वाहन धारकांना त्रास होत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलून नेली जातात. यात वाहन धारकांवर दंड आकारला जात असून टोर्इंग व्हॅनचा खर्चही वसूल केला जातो. आता या खर्चात आणखी वाढ होणार असल्याचे संकेत वाहतूक नियंत्रक पोलीस शाखेने दिले आहेत.वर्धा शहर वाहतूक नियंत्रक पोलीस शाखेकडे नो पार्किंगमधील वाहने उचलून आणण्याकरिता स्व-मालकीची टोर्इंग व्हॅन नाही. परिणामी, यासाठी भाडेतत्वावर वाहन घेण्यात आले आहे. या वाहन धारकाला दररोज दोन हजार रुपये याप्रमाणे भाडे अदा करावे लागते. वाहतूक पोलिसांकडून उचलून आणलेल्या वाहनांवर २०० रुपये दंडाची कारवाई केली जाते. या व्यतिरिक्त वाहन भाड्यापोटी ५० रुपये वसूल केले जातात. असे २५० रुपये वाहन धारकाकडून वसूल केले जात होते; पण आता अनेक वाहन धारकांना शिस्त लागल्याने वाहतूक पोलिसांना नो पार्किंगमध्ये वाहने मिळत नाहीत. परिणामी, दररोज १५ ते २० वाहनेच पोलिसांच्या हाती लागतात. यात टोर्इंग व्हॅनचा खर्चही निघत नसल्याचे सांगण्यात आले आहे. काही महिन्यांत टोर्इंग व्हॅनचे भाडे पोलीस कर्मचाºयांना द्यावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.मोठ्या शहरांमध्ये टोर्इंग व्हॅनच्या भाड्यापोटी वसूल करण्यात येणारी रक्कम अधिक आहे. यामुळे तेथील वाहतूक पोलिसांना तो खर्च करणे शक्य होतो. मुंबई येथे दंडाची रक्कम २०० रुपये तथा टोर्इंग व्हॅनचा खर्च २०० रुपये, असा ४०० रुपये दंड दुचाकी, चार चाकी वाहन चालकांना केला जातो. वर्धा शहरात मात्र केवळ ५० रुपये अधिक आकारले जातात. आता टोर्इंग व्हॅनचा खर्चही निघत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानुसार टोर्इंग व्हॅनच्या खर्चामध्ये २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत टोर्इंग व्हॅनद्वारे नो पार्किंगमधील दुचाकी वा चार चाकी वाहन उचलून नेल्यास संबंधित वाहन धारकाला २५० रुपये आकारले जात होते.आता १० फेबु्रवारीनंतर टोर्इंग व्हॅनद्वारे वाहन उचलून नेल्यास २७० रुपये आकारले जाणार आहेत. यातील २०० रुपये ही दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली जाणार असून ७० रुपये टोर्इंग व्हॅनचे भाडे म्हणून आकारले जाणार आहेत. यामुळे शिस्तीने पार्किंगच्या जागेमध्ये वाहने उभी न केल्यास आता वाहन धारकांना २७० रुपयांच्या दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.बाजार ओळीत पी वन, पी टूचा आधारशहरात पालिकेच्यावतीने कुठेही पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरात अन्यत्र पालिकेकडे तथा महसूल विभागाकडे मोकळ्या जागा असल्या तरी बाजारपेठेमध्ये मात्र फारशी जागा उपलब्ध नाही. यामुळे वाहतूूक पोलिसांनाच त्यावर तोडगा काढावा लागला आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी बाजारपेठेमध्ये पार्किंगसाठी पी वन, पी टू ही योजना आखली होती. यात आठवड्यातील ठराविक दिवशी रस्त्याच्या एका बाजूने तर अन्य ठराविक दिवशी रस्त्याच्या दुसºया बाजूने वाहने उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या व्यवस्थेमुळे रस्त्याची एक बाजू तरी रहदारीसाठी तथा पादचाºयांसाठी उपलब्ध राहते. सध्या ही पद्धत पुन्हा अंमलात आणण्यात आली आहे. या व्यवस्थेचा बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राखण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.पार्किंगचे लावले फलकशहरात वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी दुचाकी, चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तत्सम फलकही त्या-त्या जागेवर लावण्यात आलेत. काही ठिकाणी या फलकांसमोर अतिक्रमण करण्यात आल्याचेही पाहावयास मिळत आहे. असे असले तरी वाहने ठेवायची असल्यास त्या भागातील वाहतूक पोलीस संबंधिंत वाहन धारकांना तेथील जागा मोकळी करून देत असल्याचे पाहावयास मिळते. हा प्रकार बजाज चौकातच अधिक दिसून येतो.