शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:52 IST

स्थानिक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुख्याधिकारी दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देनगर परिषद कर्मचाऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुख्याधिकारी दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाच दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.याप्रसंगी संतप्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामगार पुढारी व नगर सेवकांनी दंडवते यांच्याशी दोन तास चर्चा केली; पण कर्मचारी व प्रशासन यांच्यात एकाही मागणीवर एकमत झाले नाही. शेवटी कर्मचारी संघटनेद्वारे अ‍ॅड. कोठारी यांनी पाच दिवसांत ाागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आज न.प. कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कोणतीही पूर्व सूचना न देता स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांना निलंबित करणे, तांत्रिक पदावर अतांत्रिक कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे प्रकार बंद करावे. २५ वर्षांपासून विविध विभागात लिपिक, शिपाई पदावर अतिरिक्त मोबदला न घेता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाच्या कामावर पाठवून त्यांना दुय्यम दर्जाची कामे देण्यात आली. अशा कर्मचाऱ्यांना पूर्व पदावर घेण्यात यावे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार फेब्रुवारी २०१८ पर्यंत १४ महिन्यांचा किमान वेतन वाढीव मोबदला ११८ रुपये प्रतिदिवसप्रमाणे देण्यात यावा. शासन निर्णयानुसर १ जानेवारी २०१८ पासून सुधारित किमान वेतन वाढीव दर त्वरित लागू करावा. निवृत्त स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची एकमुस्त रक्कम द्यावी. भविष्य निर्वाह निधी दंडाची थकित रक्कम भरणा करावी. २७ आॅक्टोबर २०१६ पासून सफाई कामगारांना कामाचा मोबदला देऊन शासकीय सुट्यांचा लाभ द्या, रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा प्रस्ताव अडीच महिन्यांपासून प्रलंबित असून तो त्वरित शासनाकडे पाठवा, लाड, पागे समितीच्या धोरणानुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक आधारावर पदोन्नती देऊन अवैध पदोन्नती रद्द आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. संतप्त कर्मचाऱ्यांनी नारेबाजी करीत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निषेध केला. यावेळी अ‍ॅड. कोठारी तथा माजी न.प. अध्यक्ष सुरेश मुंजेवार, नगरसेवक आफताब खान, नीता धोबे, प्रकाश राऊत, धनंजय बकाने, देवा कुबडे, सुनील डोंगरे यासह कर्मचारी, सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.न.प. अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कार्यवाही व बदल्या प्रशासकीय सोयीसाठी गरजेचे असल्याने करण्यात आल्या. ही कार्यवाही नियमानुसार आहे. निवेदनातील मागण्यांबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल.- मिनीनाथ दंडवते, मुख्याधिकारी, न.प. हिंगणघाट.