शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनाची ओळख आता ‘नंबर’ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:59 IST

केंद्र शासनाने आधार नोंदणी उपक्रम हाती घेऊन प्रत्येक नागरिकाला ‘नंबर’ने नवी ओळख दिली. याच पार्श्वभूमीवर शासनाने सध्या बारा आकडी युनिट कोडचे टॅग जिल्ह्यातील पशुधनाला लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्देदोन टप्प्यांत होणार काम : आधारच्या पार्श्वभूमीवर जनावरांना युनिक टॅग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने आधार नोंदणी उपक्रम हाती घेऊन प्रत्येक नागरिकाला ‘नंबर’ने नवी ओळख दिली. याच पार्श्वभूमीवर शासनाने सध्या बारा आकडी युनिट कोडचे टॅग जिल्ह्यातील पशुधनाला लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून टॅगच्या माध्यमातून प्रत्येक जनावराची इत्यंभूत माहिती आधार सारखीच सहज उपलब्ध होणार आहे. दोन टप्प्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.जनावरांची ओळख पटावी व त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावे या उद्देशाने पशुसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. यात आधारप्रमाणे बारा आकडी युनिक कोडचा टॅग जनावरांना लावण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांची ओळख आता बारा आकडी कोड राहणार आहे. टॅग लावण्याचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार असून पहिल्या टप्प्याचे काम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात दुधाळ जनावरे असलेल्या गाई-म्हशींचा समावेश आहे. तर दुसºया टप्प्यात शेळी आदी उर्वरित सर्व पशुधनाला टॅग लावण्यात येणार आहे.युनिक टॅग असल्यावरच होईल जनावरांची खरेदी-विक्रीपशुसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पशुधनाला टॅग लावण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनावरांची ओळख सहज पटविता येणार आहे. त्यांच्या संख्येची माहितीही पशुसंवर्धन विभागाला या द्वारे मिळणार आहे. लावण्यात येणारे टॅग जनावरांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पशुपालकाला उपयुक्त ठरणार आहे. सदर टॅग असलेल्या जनावरांचीच यापूढे खरेदी-विक्री होणार आहे.९५० जनावरांना लावले टॅगसदर उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुधाळ जनावरांना टॅग लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान आतापर्यंत ९५० गाई व म्हशींना टॅग लावण्यात आले आहे. त्यापैकी २६८ जनावरांची माहिती आॅन लाईन प्रणालीवर नोंदविण्यात आली आहे. यामुळे सदर जनावरांची इत्तमभूत माहिती आॅन लाईन उपलब्ध होणार आहे.