शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वर्धा जिल्ह्यात स्वतंत्र प्रकल्प कार्यालयाचा विचार व्हावा

By admin | Updated: April 14, 2017 02:22 IST

आदिवासींसाठी प्रकल्प कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता; पण सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय दिले.

अ.भा. आदिवासी विकास परिषदेची मागणी : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांना निवेदनवर्धा : आदिवासींसाठी प्रकल्प कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता; पण सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय दिले. अद्याप नियमित सहायक प्रकल्प अधिकारी दिला नाही. सदर अधिकारी मुख्यालयी राहत नाही. त्यांच्याशी संवाद साधला असता ते उद्धट वागणूक देतात. यामुळे कायम सहायक प्रकल्प अधिकारी द्यावा तथा जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रकल्प कार्यालय देण्याचा विचार व्हावा, अशी मागणी अ.भा. आदिवासी विकास परिषदेने केली. याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांना निवेदन देण्यात आले.नागपूर येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्याचे विहित अर्ज वर्धा कार्यालयातून पुरविले जात आहे; पण योजना मंजूर करण्याचे काम नागपूर कार्यालयात होत आहे. यामुळे योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. अशा अनेक तक्रारी आदिवासी परिषदेकडे आहेत. यामुळे वर्धा येथेच सर्व योजनांच्या अर्जाची छाणनी करून वर्धा कार्यालयातच मंजुरी द्यावी. २०१५-१६ मध्ये ठक्करबाप्पा योजनेंतर्गत आलेल्या प्रस्तावाची योग्य तपासणी संबंधित अधिकाऱ्यांकडून झाली नसल्याची बाब प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली. यावर योग्य चौकशी करण्याची मागणी परिषदेने केली होती; पण अद्याप कुठलाही निर्णय घेणत आला नाही. आदिवासी लोकसंख्या ठरलेल्या प्रमाणानुसार नसतानाही तेथील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बरीच गावे या योजनेपासून वंचित राहिली आहेत. नागपूर प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासींसाठी सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत भूमिहिनांना जमीन देण्याची तरतूद आहे; पण वर्धा जिल्ह्यात हंगाम २०१४-१५ पर्यंत एकाही लाभार्थ्यांस लाभ दिला नाही. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात लोणसावळी येथील जमीन ३१ डिसेंबर २०१५ ला खरेदी करण्यात आली होती; पण अद्याप सदर जमीन प्रकल्प अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. संबंधित आदिवासी लाभार्थी मंजूर असताना दीड वर्षापासून जमीन त्यांच्या नावे नसल्याने उत्पादनापासून वंचित राहावे लागले. प्रत्येक लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्नाचे नुकसान झाले. याबाबत चौकशी करण्यात यावी.अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला व बाल कल्याण विभागाद्वारे मनोधर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे; पण मागील वर्षापासून अनेक प्रकरणे कार्यालयात प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी मान्यता देऊनही तसेच निधी उपलब्ध असताना संबंधित विभागांनी आलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. सदर प्रकरणात आदिवासीच्या अन्याय व अत्याचाराची प्रकरणे आहेत. या प्रकरणी निधीही परत गेल्याची माहिती आहे. सुवर्ण महोत्सव वर्ष अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांची २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीची शिष्यवृत्ती अद्याप संबंधित विद्यार्थ्यांना मिळाली नाही. सुमारे २.५ कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे असताना वाटपात विलंब होत आहे. याबाबत चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्तीचे वाटप करावे.कारंजा तालुक्यातील येणीदोडका, सेलू येथील गरमसूर, रायपूर, आर्वी येथील माळेगाव (ठेका) ही गावे बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याचा ठराव १०० टक्के लोकांनी ग्रामसभेत मंजूर केला आहे. सदर ठराव जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या गावांतील लोक वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळले असून शेती करणे टाळत आहे. ग्रामस्थांचे हाल होत आहे. याबाबत अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. गावांचा विचार करून वन विभागाकडून योग्य कार्यवाही व्हावी, आदी मागण्या अ.भा. आदिवासी विकास परिषदेने इवनाते यांना निवेदनातून केल्या आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)