शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

संमोहन हे केवळ शास्त्र नाही तर शस्त्रही!

By admin | Updated: October 29, 2015 02:30 IST

पूर्वी संमोहनकला ही ध्यानधारणेचा एक महत्वपूर्ण भाग होती. मोहिनी किंवा वशीकरण नावाने ओळखल्या जाणारी ही विद्या कुंडलिनी जागृती,...

जगदीश राठोड : चला संमोहित होऊया कार्यक्रम, सामाजिक व परिवर्तनवादी संघटनांचे आयोजनवर्धा : पूर्वी संमोहनकला ही ध्यानधारणेचा एक महत्वपूर्ण भाग होती. मोहिनी किंवा वशीकरण नावाने ओळखल्या जाणारी ही विद्या कुंडलिनी जागृती, साधना, विपश्यना, झेन प्रक्रिया, मेडिटेशन आदी विविध प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रात उपयोगात आणल्या गेली. मात्र, आधुनिक काळात विज्ञानाच्या नव्या निकषासह संमोहन उपचार किंवा हिप्नोथेरपी म्हणून वैद्यकशास्त्रात याचा समावेश झाला आहे. मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासोबत व्यक्तिमत्व विकसित करण्यास पुरक ठरणारे संमोहन हे जसे आधुनिक शास्त्र आहे. तसेच ते दुधारी शस्त्र म्हणूनही वापरले जात आहे, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ व संमोहनशास्त्रज्ञ डॉ. जगदीश राठोड यांनी केले. स्थानिक शिववैभव सभागृहात जिल्ह्यातील विविध सामाजिक, परिवर्तनवादी संघटनाच्यास सहकार्याने चला संमोहित होऊया या सप्रयोग कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक दिलीप सोळंके व शिववैभव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर माथनकर उपस्थित होते. पंचेद्रियांमध्ये भ्रम निर्माण केले जातात. याचे प्रात्यक्षिक सादर करताना त्यांनी गाढ संमोहनावस्थे असलेल्या व्यक्तींना शेंगा म्हणून मिरच्या खाण्यास दिल्या असता त्या गोड वाटत होत्या तर बटाटा देऊन हे कारले आहे, असे सांगताच खाणाऱ्या व्यक्तींचा चेहरा कडवट झाला होता. यावेळी, शाहरूख, सलमान, गब्बरसिंग अशी नावे दिलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ नावाचाही पूर्णपणे विसर पडला तर काही काल्पनिक प्रसंगात स्वत:चे देहभान विसरून संमोहनावस्थेतील स्त्रि-पुरूष व मुले जोरजोरात हसली, मोठमोठ्याने रडली आणि मनसोक्त नाचली. शरीराला संवेदनाहीन बनविण्याचा प्रयोगही डॉ. राठोड यांनी सादर केला.डोळे अर्धवट मिटलेले अथवा उघडे उसलेली व्यक्तीही संमोहनाच्या प्रभावात राहते, असे डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले. मंचावरील व्यक्तींना संमोहनावस्थेतून पूर्णत: बाहेर काढल्यानंतरही जगदीश राठोड यांनी स्वत:च्या तळहातावर मारलेल्या छडीचा फटका एकाचवेळी मंचावरील सर्व व्यक्तींनी केवळ सूचनेद्वारे आपल्या तळहातावर अनुभवला. मनाचे सामर्थ काय असते. याची जाणीव या वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या चित्तथरारक कार्यक्रमातून उपस्थितांना झाली. मंचावरील सादरीरणात डॉ. राठोड यांनी जयश्री राठोड यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार पंकज वंजारे यांनी मानले.या आयोजनात नूतन माळवी, अविनाश काकडे, प्रा. किशोर वानखेडे, हरिश इथापे, सुधीर गिऱ्हे, प्रा. एकनाथ मुरकुटे, नितीन झाडे, किशोर जगताप, अ‍ॅड. के.पी. लोहवे, भरत कोकावार, मुरलीधर बेलखोडे, गुणवंत डकरे, सुधीर पांगुळ, बाबाराव किटे, राजाभाऊ वानखेडे, राजू थुल, नारायण रोंघे, प्रशांत रोकडे, संदीप वरके, डॉ. चंदू पोपटकर, सुनील ढाले, अलका वानखेडे, संजय जवादे, सतीश इंगोले, विद्यानंद हाडके, राहुल तेलरांधे, संदीप भगत, नरेंद्र कांबळे, मयूर डफळे, सुरेश राहाटे, सुचिता ठाकरे, शुभम जळगावकर, स्कर्मिश खडसे, संगीता इंगळे, अ‍ॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, अतुल उडदे, ना.सि. आठवले, जयंत सबाने, श्याम भेंडे, अजय तिगावकर यांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)संमोहनाचा विधायक वापर या कार्यक्रमात मानवी मेंदूत संमोहनाद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या बदलांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण डॉ. राठोड यांनी केले. केवळ मानसोपचार म्हणूनच नव्हे तर शस्त्रक्रीयेसाठी होणारा वैद्यकीय क्षेत्रातील वापर, मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढविणे, अंगभूत गुणांना अनेकपटीने विकसित करणे, भावनांचा निचरा करणे, शारीरिक दोष घालविणे, व्यसनापासून मुक्तता, अशा अनेकानेक कारणांसाठी संमोहनाचा विधायक वापर या प्रक्रियेतून कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक डॉ. राठोड यांनी दिले. अंतर्मन आणि बाह्यमनाचा मनोव्यापार कसा चालतो. संमोहनात काय शक्य व काय अशक्य आहे, याची उकल त्यांनी यावेळी केली.