शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

गणपत गोविंद नेहारे (४८) रा. मायबाई वॉर्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी पद्मा यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. आरोपी हा गुरु चारण्याचे काम करतो. तर मृत ही घरोघरी भांडी घासण्याचे काम करायची. आरोपी गणपत हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. सोबतच दोन्ही मुलांनाही मारहाण करीत. वडीलांच्या या त्रासाला कंटाळून दोन्ही मुले घरसोडून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे मृत पद्मा व आरोपी गणपत हे पती-पत्नीच घरी असायचे.

ठळक मुद्दे१ हजाराचा दंड : सत्र न्यायालयाचा निर्वाळा

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म कारावास आणि १ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश नरेश सातपुते यांनी दिला.  गणपत गोविंद नेहारे (४८) रा. मायबाई वॉर्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी पद्मा यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. आरोपी हा गुरु चारण्याचे काम करतो. तर मृत ही घरोघरी भांडी घासण्याचे काम करायची. आरोपी गणपत हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. सोबतच दोन्ही मुलांनाही मारहाण करीत. वडीलांच्या या त्रासाला कंटाळून दोन्ही मुले घरसोडून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे मृत पद्मा व आरोपी गणपत हे पती-पत्नीच घरी असायचे. २९ जानेवारी २०१७ ला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान आरोपीने मुलाची भेट घेऊन तुझ्या आईला मारुन टाकले, तु घरी जाऊन पहा, असे सांगताच मुलगा राजेंद्र घरी गेला असता त्याला आई घरात निपचित पडलेली दिसली. तसेच तिच्या अंगावर जखमा दिसून आल्या तर चुलीमध्ये रक्ताने माखलेली काठी जळताना दिसली. तो घराबाहेर आला असता शेजाऱ्यानी तुझ्या बापानेच आईला जबर मारहाण केल्याचे सांगितले. त्यामुळे राजेंद्र याने आर्वी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन आजुबाजुच्यांचे बयाण नोंदविले. तसेच घटनास्थळावरुन रक्ताने माखलेली काठी, कापडे जप्त केले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने ११ साक्षीदारांची साक्ष आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे आरोपी गणपत नेहारे याला तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश नरेश सातपुते यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता विनय आर.  घुडे यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून आर्वी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अजय खांडरे यांनी कामगिरी बजावली.

टॅग्स :Courtन्यायालयMurderखून