लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने प्रियकराच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास नागठाणा रस्त्यावरील एका गॅरेज परिसरात ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.कैलास ढुमणे रा. मोहा जि. यवतमाळ असे मृताचे नाव असल्याचे रामनगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कैलास ढुमणे हा आरोपी विलास ऊर्फ बाल्या कासार रा. कळंब, जि. यवतमाळ याच्या पत्नीसोबत मागील काही दिवसांपूर्वी वर्ध्यात आला होता. कैलास आणि विलासच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. आपली पत्नी कैलाससोबत वर्ध्यात असल्याची माहिती विलास कासार याला मिळाली. विलासने थेट वर्धा गाठून पत्नी राहत असलेले ठिकाण गाठले. तेथे तिघांनीही एकमेकांसोबत चर्चा केली. त्यानंतर विलास कासार, कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी हे तिघेही सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पायदळ नागठाणा रस्त्याने धोत्रा (रेल्वे) येथे जाण्यास निघाले. मात्र, पाऊस सुरु झाल्याने तिघांनी शेखर मोटर्स या गॅरेजच्या शेडखाली आसरा घेतला. तिघांनीही तेथील एका ढाब्यावर जेवण केले. पाऊस जोरात असल्याने त्यांनी शेडखालीच थांबण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी गाढ झोपेत असताना मनात राग धरुन असलेल्या विलासने रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या दगडाने ठेचून कैलासची निर्घृण हत्या केली.चेहरा ठेचल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या कैलासला पाहून विलासच्या पत्नीने आरडाओरड केली. दरम्यान विलास कासार याने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिकांना ओरडण्याचा आवाज आला असता नागरिक घराबाहेर आले असता त्यांना कैलास ढुमणे हा रक्ताच्या थारोळयात पडून असलेला दिसला. त्यातील एका सुज्ञ नागरिकाने रामनगर ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांना भ्रमणध्वनीने खूनाची माहिती दिली. काही वेळातच रामनगर ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. गुरुवारी सकाळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.दोघांनीही ढोसली ॅहोती दारूआरोपी विलास पत्नीला भेटल्यावर त्याने पत्नीशी चर्चा करून मुला-बाळांची हालचाल विचारली त्यानंतर विलास व मृतक कैलास हे धोत्रा येथे पायदळ जाताना एका ढाब्यावर थांबले. तेथे दोघांनी आधी दारु रिचवली. नंतर जेवण करुन झोपी गेले. कैलास गाढ झोपेत असताना विलासने दगडाने त्याचा चेहरा ठेचून त्याची हत्या केली आणि घटनास्थळाहून पसार झाला.पत्नीला मारण्याचा डाव फसलाआरोपी विलास उर्फ बाल्या कासार याच्या मनामध्ये पत्नी व तिचा प्रियकर कैलास ढुमणे या दोघांबद्दल राग होता. गॅरेजच्या आसरा घेऊन थांबलेल्यानंतर रात्रीला घडलेला थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यातील हालचालीवरुन आरोपी विलासने पत्नीलाही मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, तीने आरडओरड केल्याने नागरिकांना जाग आल्याने विलासचा हा प्रयत्न फसल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. रामनगर पोलीस आरोपीच्या शोधात रवाना झाले आहे.
पतीने काढला पत्नीच्या प्रियकराचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST
मध्यरात्रीच्या सुमारास कैलास ढुमणे आणि विलासची पत्नी गाढ झोपेत असताना मनात राग धरुन असलेल्या विलासने रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या दगडाने ठेचून कैलासची निर्घृण हत्या केली. चेहरा ठेचल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या कैलासला पाहून विलासच्या पत्नीने आरडाओरड केली. दरम्यान विलास कासार याने तेथून पळ काढला.
पतीने काढला पत्नीच्या प्रियकराचा काटा
ठळक मुद्देदगडाने ठेचून चेहरा केला विद्रुप : नागठाणा परिसरात खळबळ, आरोपीच्या शोधात पोलिसांची चमू रवाना