शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

श्रमकर्त्या शेकडो विद्यार्थ्यांनी व्यापली टेकडी

By admin | Updated: June 19, 2017 01:11 IST

हनुमान टेकडी हिरवीगार करण्यासह जलसंवर्धनाद्वारे भूगर्भातील जलपातळी वाढविण्याकरिता वैद्यकीय जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हनुमान टेकडी हिरवीगार करण्यासह जलसंवर्धनाद्वारे भूगर्भातील जलपातळी वाढविण्याकरिता वैद्यकीय जनजागृती मंचच्या पुढाकाराने प्रत्येक रविवारी महाश्रमदान करण्यात येते. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत शहरातील विविध शिकवणी वर्गाचे शेकडो विद्यार्थी, त्यांचे गुरुजन, सामाजिक संघटना, संस्थाचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले. यावेळी श्रमदानात रोप लागवडीसाठी तीन हजार खड्डे खोदण्यात आले.सकाळ्पासून महाश्रमदानासाठी वर्धेकर, विद्यार्थी, सामाजिक संघटना, संस्थेच्या प्रतिनिधींची पावले हनुमान टेकडीकडे वळली. व्हीजेएमच्या वतीने या महाश्रमदानाची पूर्वतयारी करताना खड्डे खणण्याकरिता जागा आखून ठेवण्यात आल्या होत्या. ६०० वर्धेकर फावडे, टिकास घेऊन सज्ज झाले असता योजनाबद्धरित्या श्रमदानाला सुरुवात करण्यात आली.या श्रमदानात नगराध्यक्ष अतुल तराळे, विद्यासागर कोचिंग क्लासेसचे संचालक सुरेंद्र नगराळे, शिक्षक खुशबू दुर्गे, गणेश मोहकर, रुचिरा बंडोपिया, कांचन कुलकर्णी, गणेश दुर्गे आणि २७० विद्यार्थी, प्राइम डायमण्ड अ‍ॅकेडमीचे संचालक विशाल उराडे व १४० विद्यार्थी, संस्कार कोचिंग क्लासेसचे संचालक मिलिंद कडू व ११० विद्यार्थी, न्यूटन फिजिक्स अ‍ॅकेडमीचे संचालक पिसे व ५० विद्यार्थी यांचे वेगवेगळे समूह कार्यरत होते. यासह आपले सरकार, बहार नेचर फाउंडेशन, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, व्हीजेएम, जनहित मंच, शिवगर्जना ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी श्रमदानात वाटा उचलला. शिवगर्जना ढोल ताशा पथकाचे संचालक गणेश ढवळे यांनी श्रमदात्यांकरिता शीतल पेयाची व्यवस्था केली होती. तर डॉ. राजेश सरोदे, दिनेश रुद्रकार, निलेश मोहदुरे, सुभाष पाटणकर, डॉ. सचिन पावडे यांनी फराळाची व्यवस्था केली. पुढच्या रविवारी पुन्हा भेटू असा निर्धार व्यक्त करीत श्रमदानाचा हनुमान टेकडीवरील दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला.