शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार हिवरा गावासाठी सरसावले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:45 IST

तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भेट देत श्रमदान केले.

ठळक मुद्देदादाराव केचे यांनी केले श्रमदान : नागरिकांचा प्रचंड उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भेट देत श्रमदान केले. यामुळे श्रमदान करणाऱ्या हातांना बळ मिळाले आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही वॉटर कप आर्वी विधानसभा मतदार संघातील गावाला मिळावा म्हणून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रमदानासह तांत्रिक माहिती घेऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी स्पर्धेसाठी सज्ज झालेल्या गावांना यथोचित सहकार्य करण्याचे निर्देश केचे यांनी दिलेत. वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना वॉटर कप स्पर्धेने गाव एकसंघ झालेले पाहायला मिळाल्याचे म्हटले होते. ते तंतोतंत खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल ७५ तालुके सहभागी झाले आहेत. मागील वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाने पटकाविला आहे. यामुळे हा कप टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारी यंदा वाढली आहे, असेही दादाराव केचे यांनी सांगितले.हिवरा येथील श्रमदानाला माजी आमदार दादाराव केचे यांच्या सोबत भाजयुमो आर्वी तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, पं.स. सदस्य हनुमंत चरडे, वाढोणाचे सरपंच अतुल खोडे, नेरी मिर्झापूरचे उपसरपंच बाळा सोनटक्के, राजू उर्फ सचिंद्र कदम, अश्विन शेंडे, मनीष उभाड, मनोज कसर, राजाभाऊ वानखेडे, प्रमोद विसेकर यांच्यासह हिवरा येथील नागरिक उपस्थित होते.राज्याच्या २४ जिल्ह्यांत ७५ तालुक्यांत स्पर्धायंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी १० लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. या पद्धतीने स्पर्धेत विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची एकूण रक्कम जवळपास १० कोटी रुपये राहणार आहे. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांपर्यंत विस्तारली गेली आहे.