शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पंचकल्याणक महोत्सवाला राज्यभरातील भाविकांची हजेरी

By admin | Updated: February 16, 2015 01:40 IST

साडेचारशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या विजयगोपाल येथील अतिशयक्षेत्र दिगंबर जैन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ होत आहे.

पुलगाव : साडेचारशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या विजयगोपाल येथील अतिशयक्षेत्र दिगंबर जैन मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ होत आहे. येथील जिनालयात समाजबांधवांनी निर्माण केलेल्या २४ फुट उंचीच्या मानस्तंभाच्या वेदी प्रतिष्ठेसाठी मांगल्यपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या महोत्सवात रविवारी दीक्षाकल्याणक महोत्सव पार पडला. यावेळी राज्यभरातून जैन समाजबांधवांची उपस्थिती होती.या दीक्षाकल्याणक महोत्सवात मूलनायक आदीनाथस्वामींचा राज्याभिषेक विवाहसोहळा थाटात करण्यात आला. यावेळी मंगलाचरण सुहासिनी, श्वेतवस्त्रधारी श्रावक व पिवळ्या साड्या परिधान केलेल्या श्राविका यांच्यासह गजराजाच्या अंबारीवर विराजमान सुहासिनी व यजमान यांची मिरवणूक भाविकांचे आकर्षण ठरली.आचार्य सन्मती सागरजी मलराजाचे शिष्य ज्योतीपुंज मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचे सानिध्य तसेच झुल्लकश्री, सुप्रज्ञसागरजी व मुनीसंघाचे आर्शिवचनात भगवतंताचा अभिषेक, मंगलाचरण मंत्रशुद्धी वेदीशुद्धी होऊन रविवारला सकाळी तृतीय चरणात तपकल्याणक महोत्सवाला प्रारंभ झाला़ या महोत्सवासाठी उज्जैन येथील रामेश्वरजी यांचे गजराज या मिरवणुकीसाठी आले आहे़ या महोत्सवाचे पौरोहित्य रायपूर येथील वाणीभूषण प्रतिष्ठाचार्य पं़ ऋषभ अजित शास्त्री यांचे मार्गदर्शनात कारंजा (लाड) येथील आदेश जैन श्रेयस जैन, नागपूरचे संदीप जैन करीत आहे. भोपाल येथील कुलदीपकुमार व संगीत संच आपल्या रसाळ सुमधूर संगीत वाद्यवृंद्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून भवसागराच्या धारेत चिंब भिजवीत आहे. विजयगोपाल येथील जिनालयासमोर २४ फुट उंच मानस्तंभ निर्माण करण्यात आला असून या कितीस्तंभाच्या चारही दिशांना मुलनायक आदिनाथांच्या प्रतिमा असतील़ या प्रतिमाचे पुजन विलास शेंडेकार (नागपूर), अरूणकुमार बदनोरे (पुलगाव), डॉ़ प्रकाश नानोटी (विजयगोपाल), श्रीकुमार वावलकर (अमरावती) यांचे हस्ते मुनीश्री व मुनीसंघ करणार आहे. तपकल्याणक महोत्सवात भगवंताचे मातापिता सौधर्मइंद, धनपती कुबेरइंद्र, महायज्ञनाथक यांचेसह इंद्र इंद्राणी, अष्ठकुमारिका, ८१ सुहासिनी श्रावक श्राविकांनी आदिनाथ भगवंताचा विवाह, राज्यभिषेक व दीक्षाविधान इत्यादी प्रसंग व्यासपीठावरील राजदरबारात पार पडले. रविवारला पार पडलेल्या महोत्सवाचे यजमानपद प्रज्ञा प्रफुल जुननकर, कारंजा (लाड) यांनी भूषविले तर कच्छ महाकच्छ राजांची भूमिका भास्कर पोहरे (यवतमाळ), शरद काळे (जळगाव) यांनी पार पाडली़ सोमवारला ज्ञानकल्याणक महोत्सवात जिनाभिषेकक महामुनी आदिनाथांची सुधारस आहार केवलज्ञान समवशरण केवलज्ञानविधी ज्ञानकल्याणकविधी होईल. यानंतर दुपारी १२ वाजता गजराज मिरवणूक निघेल. महोत्सवात समाजबांधवांसह औरंगाबादचे महसूल उपायुक्त जितेन पापळकर, उमरेडचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, पांढरवकडा एस़डी़ओ़ संदीप महाजन, निवृत्त पोलीस अधीक्षक प्रकाश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचा यावेळी स्मृतिचिन्ह, श्रीफळ देवून सत्कार केला.(तालुका प्रतिनिधी)