शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रावण बाळ’ योजनेतील शेकडो प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: August 8, 2014 00:08 IST

निराधार वृद्धांकरिता शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जातात़ या योजना कुचकामी यंत्रणेमुळे लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याचे दिसते़ कारंजा तालुक्यात नायब तहसीलदारांच्या

कारंजा (घा़) : निराधार वृद्धांकरिता शासनाद्वारे विविध योजना राबविल्या जातात़ या योजना कुचकामी यंत्रणेमुळे लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नसल्याचे दिसते़ कारंजा तालुक्यात नायब तहसीलदारांच्या डीजीटल स्वाक्षरीकरिता शेकडो प्रकरणी प्रलंबित राहिली आहेत़ यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनेतील प्रकरणे वेळेवर सभा न झाल्याने, निवडणूक आचार संहिता वा लिपीक व संबंधित नायब तहसीलदारांच्या कामचुकार वृत्तीमुळे प्रलंबित राहत आहेत़ सुमारे एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून तालुक्यातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत़ यात लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे़ लाभार्थ्यांच्या पाठपुराव्यामुळे जून महिन्यात तहसीलदार बालपांडे यांनी विशेष लक्ष घालून समितीची तातडीची सभा घेतली़ यात शेकडो प्रकरणे मंजूर करून घेण्यात आली; पण यातील उत्पन्नाचा दाखला व तलाठ्याचा अहवाल कालबाह्य झाला़ यामुळे पुन्हा नवीन उत्पन्नाचा दाखल व तलाठी अहवाल मागविण्यात आला. अनेक तलाठ्यांच्या बदल्या झाल्याने नवीन तलाठी प्रमाणपत्र व अहवाल देण्यास तयार नाहीत. विशेष असे की, प्रकरणे मंजूर करण्यास तहसील कार्यालयाने विलंब केला आणि नवीन प्रमाणपत्र आणण्याची शिक्षा मात्र लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. वास्तविक, उत्पन्नाचे नवीन प्रमाणपत्र तहसीलदारांनी तलाठ्याकडून मागवायला हवे होते़ असे केल्यास लाभार्थ्यांना त्रास होणार नाही. नवीन उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या सबबीखाली जून महिन्यात मंजूर शेकडो प्रकरणे खोळंबली आहेत़ बीपीएल अंतर्गत श्रावण बाळ योजनेच्या मंजूर प्रकरणांचा निधी संबंधित बँकेला पाठविण्यासाठी नायब तहसीलदारांची ‘डीजीटल स्वाक्षरी’ मंजूर करून घ्यावी लागते. ही डीजीटल स्वाक्षरी मंजूर करण्याचा प्रस्ताव तहसीलने आतापर्यंत तीन वेळा वरिष्ठ प्रशासनाकडे पाठविला; पण अद्याप मान्यता मिळाली नाही़ यामुळे बिपीएल अंतर्गत श्रावणबाळ योजनेची २०० हून अधिक प्रकरणे मंजूर होऊनही प्रलंबित आहे़ अनेक गरजू लाभार्थ्यांना दैनंदिन गरजा, औषधोपचार आणि उदरनिर्वाहाची अडचण झाली आहे. तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे़(तालुका प्रतिनिधी)