शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बुडवून नदी परिसरात हुंदड

By admin | Updated: October 10, 2015 02:43 IST

पवनार येथील धाम नदीचा परिसर आणि विनोबा आश्रम पर्यटकांना नेहमी खुणावत असतो.

अनुचित प्रकार घडण्याची शक्यता : सकाळपासूनच विद्यार्थी नदीवर पराग मगर  वर्धापवनार येथील धाम नदीचा परिसर आणि विनोबा आश्रम पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. शाळेच्या सहलींनीही हा परिसर नेहमीच गजबजतो. पण याही पुढे जाऊन सध्या धाम परिसरात अनेक शाळकरी विद्यार्थी शाळेला दांडी मारून सकाळीच धाम पात्रात हुंदडण्यासाठी येतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा आणि शाळेत न जाता परस्पर बाहेर भटकण्याचा मुद्दा पुन्हा एकवार चर्चेत आला आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करून दोन मुले वारंवार त्यांना पवनार येथे आणून त्यांच्याशी गैरवर्तवणूक करीत असल्याचे निदर्शनास आले. महिला पोलीस पथकाच्या वतीने वेळीच कार्यवाही करून त्या मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ जरी टळला असला तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. सध्या शाळा बुडवून सकाळी सकाळी पवनार येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुले येत असतात. यातील बरेच विद्यार्थी हे आसपासच्या गावातील असून सायकलने ते पवानारला येतात. ही मुले शाळेत जाण्याचे निमित्त करून सकाळीच सरळ पवनार येथे येतात. त्यातही येताना खाण्यापिण्याचे जिन्नस घेऊन येत येथे छोटेखानी पार्टी करतात. त्यानंतर शाळा सुटण्याची वेळ होतपर्यंत ही लहान मुले येथे पाण्यात खेळत बसतात आणि त्यानंतर काही वेळाने घरचा रस्ता धरतात. यात काही जण चांगले पट्टीचे पोहणारेही आहेत. त्यामुळे ते पोहण्याचा आनंद घेत बसतात. परंतु अनेकदा पोहता येत नसलेली मुलेही हिम्मत करून पाण्यात उतरून प्रसंगी आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न तर उपस्थित होतोच पण शाळा बुडवून हा प्रकार होत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा आणि पालकांच्या व शिक्षकांच्या डोळ्यातील धूळफेक आदी मुद्दे उपस्थित होत आहेत. काहीच दिवसांपूर्वी दोन युवकांवर शाळकरी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तवणूक करताना आढळले. महिला पथकाला ही बाब निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई केली असली तरी यापूर्वीही अनेकवेळा त्यांना पाहिल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा विचार करता पालकांनी व शाळांनी मुलांच्या गैरहजेरीची योग्य दखल घेत यावर वचक बसण्यासाठी मुलांना असे हुंदडण्यापासून रोखणे गरजेचे आहे.