शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे पिपरी ‘खराबे’ येथे घराला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. आगरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपरी ( खराबे ) येथे नागरिकांची दिनचर्येतील कामे सुरळीत सुरू असताना घरात गॅस सिलिंडर लिक झाल्याने आग लागली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे घराला आग लागली. या घटनेत तीन शेळ्या तसेच घरातील रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेमुळे या कुटुंबावर संकटाचा डोंगरच कोसळला आहे. आगरगांव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिपरी ( खराबे ) येथे नागरिकांची दिनचर्येतील कामे सुरळीत सुरू असताना घरात गॅस सिलिंडर लिक झाल्याने आग लागली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर आपल्या कवेत घेतले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटना स्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. शिवाय अग्निशन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पण या आगीत दोन ते तीन दिवसांपूर्वी कापूस विक्री करून प्राप्त झालेली रोख रक्कम, घरात बांधून असलेल्या तीन शेळ्या, घरातील दागिने जळून खाक झाले.

खबरदारी घेण्याकडे विक्रेत्याचीही पाठच पुलगाव येथील ईशा इंडियन कंपनी या अधिकृत विक्रेत्याकडून पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांनी नुकतेच गॅस सिलिंडर घेतले होते. गॅस सिलिंडरची विक्री करताना गॅस सिलिंडर लिक तर नाही ना याची शहानिशा विक्रेत्याकडून करणे क्रमप्राप्त आहे. पण सिलिंडर तपासा असे म्हटल्यावरही सर्वच बरोबर असल्याचे सांगून गॅस सिलिंडर पंधरे यांना देण्यात आले. पूर्वीच गॅस सिलिंडर लिक आहे काय याची शहानिशा करण्यात आली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती अशी चर्चा घटनास्थळी होती.

 

टॅग्स :fireआगCylinderगॅस सिलेंडर